Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनासोबत काम करण्यास उत्सुक -शाहरूख

By admin | Updated: March 1, 2017 02:31 IST

कंगना रणौत आणि शाहरूख खानच्या चर्चेला आता दस्तुरखुद्द शाहरूखनेच पूर्णविराम दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कंगना रणौत आणि शाहरूख खानच्या चर्चेला आता दस्तुरखुद्द शाहरूखनेच पूर्णविराम दिला आहे. ‘संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात मला कंगनासोबत काम करायचे नाही’ अशी चर्चा निव्वळ अफवा असल्याचे शाहरूखने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात कंगना-शाहरूख एकत्र दिसण्याची शक्यता आता वाढली आहे. जेव्हा शाहरूखला कंगनासोबत काम करण्यावरून विचारण्यात आले तेव्हा शाहरूखने म्हटले की, ‘तुम्ही आॅनलाइन जे काही वाचता त्यावर फारसा विश्वास ठेवत जाऊ नका’ कारण माझ्या आणि कंगना विषयीच्या या चर्चा निव्वळ अफवा आहेत. गेल्या शनिवारी शाहरूखला यश चोपडा नॅशनल मेमोरियल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्याने विचारलेल्या अनेक प्रश्नांचे दिलखुलासपणे उत्तरे दिली. त्यात त्याने कंगनाविषयीच्या प्रश्नांचा खुलासा केला. काही दिवसांपूर्वी कंगनाने करण जौहरच्या शोमध्ये तिन्ही खानबरोबर काम करण्यास उत्सुक नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर शाहरूखनेदेखील कंगनासोबत काम करण्यास नकार दिल्याची अफवा पसरविण्यात आली होती. अखेर शाहरूखने यासर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.