अभिनेत्री संस्कृती बालगुडे ‘दिल, दिमाग और बत्ती या चित्रपटामध्ये बत्ती नावाची प्रमुख भूमिका साकारत आहे. या चित्रपटाविषयी संस्कृती सांगते, ‘हा एक धमाल कॉमेडी चित्रपट आहे. मी पहिल्यांदाच अशा प्रकारची विनोदी भूमिका साकारत आहे. प्रेक्षकांना एक वेगळी संस्कृती या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी आम्ही सगळ्यांनी खूपच मजा केली. माझ्या व्यक्तिरेखेच्या नावाप्रमाणेच माझी व्यक्तिरेखादेखील अतिशय हटके आणि इंटरेस्टिंग आहे. अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असल्याने सुरुवातीला मला प्रचंड दडपण आले होते. परंतु सर्वच कलाकारांनी मला खूप सांभाळून घेतले. दिलीप प्रभावळकर, सोनाली कुलकर्णी, वंदना गुप्ते, किशोर कदम या सर्वांनीच सेटवर अगदी खाण्यापिण्यापासूनच काळजी घेतली. या कलाकारांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. पुण्यामध्ये सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संस्कृती करणार बत्ती गुल
By admin | Updated: September 1, 2016 02:26 IST