Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘क्रिश-३’ चोरीची कथा

By admin | Updated: June 4, 2014 09:12 IST

क्रिश-३ या चित्रपटात कितीही टिष्ट्वस्ट असले तरी आता या चित्रपटाच्या कथेमध्ये एक असा टिष्ट्वस्ट आला आहे, ज्यामुळे चित्रपटाची पूर्ण टीमच आरोपीच्या पिंजर्‍यात उभी आहे.

क्रिश-३ या चित्रपटात कितीही टिष्ट्वस्ट असले तरी आता या चित्रपटाच्या कथेमध्ये एक असा टिष्ट्वस्ट आला आहे, ज्यामुळे चित्रपटाची पूर्ण टीमच आरोपीच्या पिंजर्‍यात उभी आहे. लखनौच्या एका वकिलाने चित्रपटाची कथा त्याच्या पुस्तकातून चोरली असल्याचा आरोप क्रिश-३ टीमवर केला आहे. उच्च न्यायालयाचे वकील रूपनारायण सोनकर यांनी हा आरोप केला आहे. २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या सुअरदान या त्यांच्या पुस्तकातून विनापरवानगी चित्रपटाची कथा घेण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाने या तक्रारीवरून चित्रपटाचे निर्माते, लेखक, कलाकार, सूचना आणि प्रसारण मंत्रालय, चिफ सेक्रेटरी अँड फिल्म रायटर असोसिएशन यांना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही ही नोटीस पाठवण्यात आली आहे. बच्चन यांनी या चित्रपटात अभिनय केला नसून सूत्रधार म्हणून आवाज दिला आहे.