Join us  

क्रिकेटर झहीर खान सागरिका घाटगेशी लग्न करण्यापूर्वी या अभिनेत्रीसोबत होता रिलेशनशीपमध्ये, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 5:01 PM

क्रिकेट आणि चंदेरी दुनिया हे दोन्ही वेगवेगळे क्षेत्र असले तरी क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडूंना बॉलिवूडमधील नायिकांचे आकर्षण नेहमीच वाटले आहे.

क्रिकेट आणि चंदेरी दुनिया हे दोन्ही वेगवेगळे क्षेत्र असले तरी क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडूंना बॉलिवूडमधील नायिकांचे आकर्षण नेहमीच वाटले आहे. अनेकदा क्रिकेट क्षेत्रातील खेळाडू जोडीदाराची निवड करताना बॉलिवूडमधील अभिनेत्रींना आपली सहचारिणी बनवण्याचा प्रयत्न करतात. यातील काहींची लग्न जुळतात तर काहींना आपले प्रेम अर्ध्यावरच सोडावे लागते. भारताचा धडाकेबाज क्रिकेटर झहीर खान(Zaheer Khan)ने देखील बॉलिवूड चित्रपट अभिनेत्री सागरिका घाटगे(Sagrika Ghatage)मध्ये त्याचा आयुष्याचा जोडीदार मिळवला. सागरिका घाटगे ही मराठमोळ्या राजघराण्याची मुलगी तर जाहीर खानच्या कुटुंबात सून बनून गेल्यानंतर ती दोन्ही धर्माच्या संस्कृतीची सांगड घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.

सागरिका सोबत लग्न करण्याआधी जाहीर खान बॉलिवूड अभिनेत्री ईशा शर्वानिला डेट करत होता. जवळपास ८ वर्षे ही जोडी पार्ट्या, इव्हेंट्सपासून ते क्रिकेट मॅचपर्यंत जवळपास सर्वत्र एकत्र दिसत होती. मात्र स्टेडियममध्ये उपस्थित असताना जेव्हा झहीर अचानक ईशाशिवाय खेळला, तेव्हा सर्वांनाच हे नातं संपल्याचे समजले. याबद्दल ईशाने मीडियाला मुलाखती दिल्या होत्या. त्यात ती म्हणाली होती की, “झहीर आणि मी खूप चांगले मित्र आहोत, पण आम्ही पुन्हा कधी भेटू, एकत्र येऊ या खूप वैयक्तिक गोष्टी आहेत. तो त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे आणि मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. आमच्यापुढे दीर्घ कारकीर्द आहे. सध्या मी माझ्या डान्स रिऍलिटी शोवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. तो एक उत्कृष्ट क्रिकेटर आहे आणि मला आशा आहे की तो खरोखरच चांगला खेळ खेळेल. त्याने आपले लक्ष क्रिकेटवरून हटवू नये. 

यादरम्यान झहीर खान व्हीजे गायिका रमोना एरिनाशी असलेल्या जवळीकीच्या बातम्याही समोर येऊ लागल्या. त्यामुळे ईशा आणि झहीरच्या विभक्त होण्यामागे हेच कारण आहे का असा प्रश्न सर्वांना पडला होता. या चर्चेवर देखील ईशाने मौन सोडले होते, माझ्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल बरीच चर्चा झाली, याबाबतीत अफवा पसरवली गेली की आम्ही घर विकत घेतले आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत… हा सर्व मूर्खपणा आहे! जर ते खरे असते तर मी आत्तापर्यंत लग्न केले नसते का, बरोबर? तेव्हा मला प्रतिक्रिया द्यायची नव्हती, मी लोकांना जे हवे ते बोलू दिले. आमच्या कुटुंबियांना अर्थातच याबद्दल खूप काळजी वाटली. पण जे झाले ते झाले यावर आता चर्चा नकोत. असे म्हणून तिने हे नातं संपुष्टात आले असल्याचे सांगितले होते. 

झहीर खानने नोव्हेंबर २०१७ मध्ये सागरिका घाटगेसोबत लग्नगाठ बांधली. सागरिकाच्या शांत स्वभावाने आणि तिच्या निस्सीम सौंदर्याने झहीरला आकर्षित केले होते. एका मजेदार व्हिडिओमध्ये झहीरने खुलासा केला होता की त्याला काही मिनिटांसाठी सागरिकाच्या वडिलांना भेटायचे होते. सागरिकाच्या वडिलांसोबतची त्याची पहिली भेट होती पण ही भेट जवळपास तीन तास चालली होती.

टॅग्स :झहीर खानसागरिका घाटगे