क्रिकेट हा आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी त्याचा ‘फीवर’ प्रत्येकात दिसतो. क्रिकेटपटू जसे अभिनय करताना दिसतात तसेच अनेक कलाकारही क्रिकेटचे वेड जपतात. आपली ही आवड जपत श्रेयस तळपदे प्रत्यक्ष आयुष्यातही चांगला व वेगवान गोलंदाज असल्याने ‘इकबाल’सारखी मोठी फिल्म त्याला मिळाली आणि त्याच्या अभिनय क्षेत्रातील करियरलाही वेगळी कलाटणी मिळाली. याच धर्तीवर इतिहासाची पुनरावृत्ती म्हटले तर अभिनेता माधव देवचक्के याला आपल्या क्रिकेटच्या वेडाने ‘अगं बाई अरेच्चा २’सारखा मोठा चित्रपट मिळवून दिला. ‘अगं बाई अरेच्चा २’ हा चित्रपट २२ मे रोजी प्रदर्शित होत आहे.
‘क्रिकेट का फीवर’ मराठी सिनेमातही
By admin | Updated: May 20, 2015 23:17 IST