जगभरात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे काही राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यादरम्यान विदेशात अडकलेल्या काही सेलिब्रेटींच्या बातम्या येत आहेत. या यादीत आता ये है मोहब्बतेंची अभिनेत्री अदिती भाटियाचाही समावेश आहे. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे जो खूप व्हायरल होतो आहे.
अदितीने एकता कपूरच्या ये है मोहब्बतें मालिकेत रूही भल्लाची भूमिका केली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात रेल्वे आणि हवाई प्रवास 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. त्यात आता अदिती अमेरिकेतील लॉस अँजेलिस मध्ये अडकली आहे. ही माहीती खुद्द तिनेच व्हिडिओ च्या माध्यमातून दिली आहे.
अदितीने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती दररोजचे रुटीन फॉलो करताना दिसत आहे. यासोबतच तिने हेही सांगितले आहे की घरात राहून आता ती किती बोर झाली आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की,क्वारंटाईनने मला असे बनवले आहे. सध्या तुम्ही मला टिकटॉक वर फॉलो करा.
अदिती ये है मोहब्बतेंनंतर टेलिव्हिजन वर खतरा खतरा खतरा शो मध्ये सेलिब्रिटी पाहुणी म्हणून दिसली होती.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत.