पनवेल : प्रसिद्ध सिने अभिनेता सलमान खान पनवेलमधील फार्महाउसवर आला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले आहेत. यामुळे सलमान खानने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.
पनवेल जवळच्या वाजेपुर येथील अर्पिता फार्म हाउसवर सलमान खान बुधवारी रात्रीच दाखल झाला आहे. संचार बंदी असल्याने पुढील २१ दिवस तो या ठिकाणीच थांबण्याची शक्यता आहे. सलमान खान सोबत त्याचे वडील सलीम खान आणि कुटुंबीय आहेत.
कोरोनापासून वाचण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील अलिबागच्या फार्म हाऊसवर गेले आहेत. अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांनी सेल्फ आयसोलेशन केले आहे. तर लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाच्या भीतीने बॉलिवूडचे चित्रिकरण ठप्प झाले आहे. गायिका कनिका कपूरमुळे सिने तारकांनी धास्ती घेतली आहे. कनिका कपूरला कोरोना झाला असून तिने लंडनहून भारतात येताच अनेक बड्या हस्तींसोबत पार्ट्यांना हजेरी लावली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. काही दिवसांनी ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते.