करण जोहरच्या ‘ब्रदर्स’ चित्रपटांतील ‘मेरा नाम मेरी’ गाणे रिलीज झाले. हे एक आयटम साँग आहे. ज्यात करिना ‘मेरी’ बनून सेक्सी दिसत आहे. ती सिद्धार्थ मल्होत्राच्या भोवती डान्स करतांना दिसत आहे. हे गाणे ‘जत्रा’ चित्रपटातील ‘ये गा ये, ये मैना...’ या गाण्याची कॉपी केलेले आहे. यात भरत जाधव, क्रांती रेडेकर आदी कलाकार होते. धर्मा प्रोडक्शनचा ‘अग्निपथ’ चित्रपटांत ‘चिकनी चमेली’ याच चित्रपटातुन घेतले होते. अजय-अतुल यांनी मराठी चित्रपटांत काम करण्यासोबतच ‘अग्निपथ’ आणि ‘ब्रदर्स’ चित्रपटांतही काम केले आहे. हा हॉलीवुड चित्रपट ‘वॉरियर्स’ चा रिमेक आहे. यात अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकलीन फर्नांडिस आणि जॅकी श्रॉफ आहेत.
‘मेरी’आयटम साँग ‘ये मैना’ची कॉपी
By admin | Updated: July 10, 2015 22:07 IST