Join us
Daily Top 2Weekly Top 5

पती निकसाठी देसी गर्ल शिकतेय कुकिंग ; व्हिडीओ केला शेअर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 17:32 IST

आता हे दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत. ते समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे. या व्हिडीओत प्रियांका कुकिंग करताना दिसतेय तर निक तिची व्हिडीओ शुटिंग करताना दिसत आहे. थोडक्यात काय तर, देसी गर्ल प्रियांकाने पतीसाठी कुकिंग शिकायला सुरूवात केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने एखादी गोष्ट केली अन् त्याची चर्चा झाली नाही, असे कधी होत नाही. नवदाम्पत्य प्रियांका चोप्रा-जोनस आणि निक जोनस यांच्यावर मीडियाची नजर असतेच. ते काय करतात? कुठे जातात? याचे सगळेच अपडेट्स मीडियामुळे मिळतातच. लग्नानंतर देसी गर्ल वेगवेगळया कारणांनी चर्चेत राहिली. मध्यंतरी अमेरिकन प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सुद्धा छापून आल्या मात्र त्या दोघांनीही या सर्व चर्चा अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. आता हे दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत. ते समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे. या व्हिडीओत प्रियांका कुकिंग करताना दिसतेय तर निक तिची व्हिडीओ शुटिंग करताना दिसत आहे. थोडक्यात काय तर, देसी गर्ल प्रियांकाने पतीसाठी कुकिंग शिकायला सुरूवात केली आहे.

सध्या प्रियांका-निक हे क्यूट कपल सध्या फ्रान्समध्ये सुट्ट्या एंजॉय करत आहे आणि सोबतच सर्वांना कपल गोल्ससुद्धा देत आहेत. निक-प्रियांकाने जो आणि सोफीच्या लग्नानंतर त्यांची सुट्टी वाढवून घेतली असून ते सध्या फ्रान्समधील त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. अशातच आता प्रियांकाचा कुकींग व्हिडीओ समोर आला आहे. निक जोनसने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये प्रियांका जेवण बनवताना दिसत आहे, तर निक तिला यात मदत करताना दिसत आहे. निकने या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तो आणि प्रियांकाने त्यांच्या डेट नाईटसाठी कुकिंग क्लास लावल्याचा खुलासा केला आहे. यामध्ये प्रियांका आणि निक पास्ता आणि सॉस बनवताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये निक प्रियांका खूप एंजॉय करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत प्रियांका तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याविषयी बोलली होती. ती म्हणाली, ‘एखादी व्यक्ती तुमचा बॉयफ्रेंड असणं आणि नवरा असणं किती वेगवेगळं आहे हे मला माहित नव्हतं. जेव्हा तुम्ही एकत्र वचन घेता त्यावेळी ती व्यक्ती तुमचं कुटुंब आहे आणि मी हे कुटुंब स्वीकारलं आहे. हे आपसुकच तुमच्या मनात येतं. त्या व्यक्तीच्या प्रति तुमच्यावर असलेली जबाबदारी तुम्हाला जाणवते. तुम्हाला एकमेकांबद्दल रोज काहीतरी नवं समजत असतं.’

टॅग्स :प्रियंका चोप्रा