Join us

यंदाच्या पर्वातील 'बिग बॉस-९' चे स्पर्धक

By admin | Updated: October 12, 2015 22:04 IST

सर्वात वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस-९'ची धमाकेदार सुरूवात रविवारी झालीय. बिग बॉसच्या या आलिशान घरात १४ स्पर्धत तब्बल तीन महिने बंद राहणार आहेत.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. १२ - सर्वात वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'ची धमाकेदार सुरूवात झाली. बिग बॉसच्या आलिशान घरात १४ स्पर्धक तब्बल तीन महिने बंद राहणार आहेत. नेहमीच वादात असणारा रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचं नववे सत्र सुरू झाले आहे . यावेळी डबल-ट्रबल ही थीम आहे. बिग बॉसच्या घरात कोण-कोणते सेलिब्रेटी राहणार आहेत याबाबत नेहमीच उत्सुकता असते. बिग बॉसच्या घरात यावेळी स्पर्धक पहिल्यांदाच दोन-दोनच्या जोडीत दिसताील.बॉलिवूडचा दबंग खान सलमान सहाव्यांदा बिग बॉस-९चं सुत्र संचालन करणार आहे.  सर्व रिअ‍ॅलिटी शोचा 'बाप' असणाऱ्या या शोमध्ये कोण स्पर्धक असणार ते पाहा. 

१) अंकित गेरा - 'सपने सुहाने लडकपन के' या मालिकेतील अभिनेता अंकित गेरा २) रूपल त्यागी - 'सपने सुहाने लडकपन के' या मालिकेत अभिनेत्रीच्या भूमिकेत असलेली रूपल त्यागी बिग बॉसच्या घरात असेल. यापूर्वी 'झलक दिखला जा'च्या शोमध्ये ती अंकित गेरासोबत होती. आता दोघांचं ब्रेक अप झालंय. त्यामुळं या दोघांची बिग बॉसच्या घरातील केमेस्ट्री पाहण्यासारखी असेल.३) दिगगंना सूर्यवंशी - दिगंगना 'एक वीर की अरदास वीरा' मालिकेत अभिनेत्रीच्या प्रमुख भूमिकेत होती. ४) अमन वर्मा - भारतीय टेलिव्हिजनचा प्रसिद्ध चेहरा अमन वर्मा नेहमीच चर्चेत असतो. एकेकाळी टिव्हीवर राज्य गाजवणारा अमन सध्या लाइमलाईटपासून दूर आहे. पण आता बिग बॉसच्या घरात त्याचं नवं रूप पाहायला मिळेल. अमन वर्मावर २००५ मध्ये कास्टिंग काउचचा आरोप लागला होता. ५) रोचेल मारिया राव - मॉडेल, अभिनेत्री असलेली रोचेल २०१२ फेमिना मिस इंडिया या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची विजेती होती. २०१३मध्ये आयपीएलचं तिनं होस्टिंगही केलं. बिग बॉसच्या डबल ट्रबलमध्ये ती तिचा बॉयफ्रेंड मॉडेल-अ‍ॅक्टर कैथ सेक्वेरिया सोबत दिसेल.६) कीथ सेक्वेरिया - मॉडेलिंग क्षेत्रात कैथचा चेहरा ओळखीचा आहे. त्यानं अनेक शो होस्ट सुद्धा केलेत. शिवाय काही चित्रपटांमध्येही त्यानं काम केलंय. वेगळाच रोमान्स यावेळी बिग बॉसच्या घरात पाहायला मिळेल.७) किश्वर मर्चंट - किश्वर मर्चंट टिव्हीवरील प्रसिद्ध चेहरा बिग बॉसच्या घरात असेल याबाबत अफवा पसरलीय. कदाचित किश्वर सुयश राय आपल्या बॉयफ्रेंडसोबत बिग बॉसच्या घरात दिसेल.८) सुयश राय - आतापर्यंत आपल्याला कळलंच असेल डबल-ट्रबल या यंदाच्या बिग बॉसच्या सिझनमध्ये कपल्स दिसणार आहेत. काही सध्याचे कपल्स आणि एक्स कपल्स... सुयश राय अभिनेता-गायक 'प्यार की ए एक कहानी' चित्रपटात आपल्याला दिसला. गर्लफ्रेंड किश्वर रायसोबत आपल्याला बिग बॉसच्या घरात दिसू शकेल. ९) युविका चौधरी - 'ओम शांती ओम', 'समर २००७' आणि 'तो बात पक्की'मध्ये काम केले आहे. १०) विकास भल्ला - अभिनेता आणि गायक आहे. ११) प्रिंस नरूला - 'एम टिव्ही रोडीज'चा विनर आहे. १२) अरविंद वेगडा - हे प्रसिद्ध गायक आहेत. १३) मंदाना करीमी - इराणी मॉडेल आणि अभिनेत्री या पर्वात सहभागी असेल. मंदाना करीमी हीने भाग जॉनी मध्ये अभिनय केला आहे. १४) रीमी सेन - गोलमाल, धूम, हंगामा या चित्रपटामध्ये अभिनय केला आहे.