Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘जस्ट हलकंफुलकं’ नाटकाचे २०० प्रयोग पूर्ण

By admin | Updated: August 27, 2015 04:59 IST

धमाल विनोदी ‘जस्ट हलकंफुलकं’ या नाटकाचे नुकतेच २०० प्रयोग पूर्ण झाले. नाटकाच्या दोनशेव्या प्रयोगाच्या वेळी अनेक मराठी कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली

धमाल विनोदी ‘जस्ट हलकंफुलकं’ या नाटकाचे नुकतेच २०० प्रयोग पूर्ण झाले. नाटकाच्या दोनशेव्या प्रयोगाच्या वेळी अनेक मराठी कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील प्रसिद्ध जोडी सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे यांच्यासोबत अभिनेत्री अनिता दाते या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाच; त्याचबरोबर अनेक कलाकारांनीही त्याला पसंती दिली. या २०० व्या प्रयोगानंतर उमेश कामत, प्रसाद ओक, श्रेया बुगडे, कविता लाड, सतीश राजवाडे, विद्याधर जोशी, राजन भिसे, अनिकेत विश्वासराव, मंगेश बोरगावकर या कलाकारांच्या उपस्थितीत केक कापून सेलीब्रेशन करण्यात आले. हे नाटक पंधरा वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले होते. तेव्हा रसिका जोशी, विजय कदम आणि नंदू गाडगीळ या तीन कलाकारांनी या भूमिका केल्या होत्या. हलकंफुलकं नाटक हे ऋषिकेश परांजपे यांनी लिहिलेले असून, आता याच नाटकात थोडे बदल करून दिग्दर्शक गणेश पंडित यांनी ते रंगमंचावर आणले आहे.