Join us

ड्रामा क्वीन राखी सावंतने 'त्या' वादग्रस्त वक्तव्यासाठी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 14:03 IST

ड्रामा क्वीन म्हणून लोकप्रिय असलेल्या राखी सावंतने एका खाजगी चॅनेलवर काही वर्षांपूर्वी भगवाल वाल्मिकी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.

मुंबई : ड्रामा क्वीन म्हणून लोकप्रिय असलेल्या राखी सावंतने एका खाजगी चॅनेलवर काही वर्षांपूर्वी भगवान वाल्मिकी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्याबाबत तिने आता माफी मागितली आहे. राखीने वाल्मिकी समुदायाच्या उपस्थितीत माफी मागितली. 

राखीने वाल्मिकी समुदायाच्या लोकांना सांगितले की, भगवान वाल्मिकी यांचा मी खूप सन्मान करते. गेल्यावर्षी राखी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी कोर्टात राखी विरोधात तक्रार दाखल करणारे नरेंद्र आदिया हेही उपस्थित होते. त्यांनी दावा केलाय की, राखीने कोर्टात लिखित माफी मागितली आहे आणि पुढील सुनावणी 18 मे रोजी होणार आहे. 

याची माहिती मिळताच जेव्हा मीडियाचे लोक तिथे पोहोचले पण त्यांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. नंतर राखीने स्वत: मीडियासमोर भगवान वाल्मिकी यांच्या फोटोला नमस्कार केला आणि तिने त्यांच्याबद्दल काढलेल्या अपशब्दाबद्दल माफीही मागितली.

टॅग्स :राखी सावंतबॉलिवूड