Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘चांद नवाब’वर आता कॉमेडी फिल्म

By admin | Updated: July 31, 2015 03:21 IST

सलमान खान याच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी टीव्ही पत्रकार चांद नवाब यांची भूमिका केली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील कराचीचे टीव्ही पत्रकार

सलमान खान याच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी टीव्ही पत्रकार चांद नवाब यांची भूमिका केली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील कराचीचे टीव्ही पत्रकार चांद नवाब यांची खूप चर्चा सुरू झाली. त्याच्या संदर्भातील एक व्हिडिओ क्लीपदेखील बजरंगीमध्ये चित्रित करण्यात आली आहे. आता अशी चर्चा सुरू आहे की, बॉलीवूडमध्ये चांद नवाब या शीर्षकाखाली चित्रपट बनविण्यात येणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असेल. चित्रपटाच्या केंद्रस्थानी एका टीव्ही पत्रकाराची भूमिका असेल, परंतु त्याचा बजरंगीसोबत काहीही संबंध असणार नाही. प्राथमिक चर्चेनंतरच नवाजुद्दीनसोबत संपर्क करण्यात येणार आहे. नवाजुद्दीनने जर नकार दिला तर इतर कलाकारासोबत चित्रपट करण्यात येईल; पण नवाजुद्दीन निर्मात्यांची पहिली पसंती असणार आहे.