Join us

काजोल करणार पुनरागमन

By admin | Updated: October 21, 2014 00:26 IST

राम माधवानी यांच्या आगामी चित्रपटातून काजोल बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याचे सांगण्यात येत होते

राम माधवानी यांच्या आगामी चित्रपटातून काजोल बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याचे सांगण्यात येत होते, हा चित्रपट पेनोजा नावाच्या एका इंग्रजी टीव्ही सिरिअलवर आधारित होता; पण काही दिवसांनी या चित्रपटात काम करायला काजोलने नकार दिला. आता काजोल अजय देवगणच्या मदतीने पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. अजयने हाऊ ओल्ड आर यू नावाच्या एका मलयालम चित्रपटाचे अधिकार खरेदी केले आहेत. काजोलसाठी तो या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. सूत्रांनुसार पेनोजाच्या निर्मात्यांशी अजयची बोलणी फिस्कटली तेव्हापासूनच तो नव्या विषयाच्या शोधात होता. काजोललाही हा चित्रपट आवडला असून ती अभिनयात पुनरागम करण्यास उत्साहित आहे. अद्याप अजयने दिग्दर्शकाची निवड केलेली नाही. चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे.