Join us

सामान्य बायकांच्या कथा उलगडणार, 'बाईपण भारी रं' लवकरच सुरू होणार, नव्या मालिकेचा प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 09:45 IST

प्रत्येक घरातील सामान्य स्त्रीची, बायकांच्या मनातील गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या मालिकेचं नाव 'बाईपण भारी रं' असं असून त्याचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

येत्या काही दिवसांत छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना नव्या मालिकांची मेजवानीच मिळणार आहे. कलर्स मराठीवर घटस्थापनेच्या मुहुर्तावर आई तुळजाभवानी ही मालिका सुरू होणार आहे. याबरोबरच कलर्स मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी आणखी एक नवी मालिका घेऊन येत आहे. प्रत्येक घरातील सामान्य स्त्रीची, बायकांच्या मनातील गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या मालिकेचं नाव 'बाईपण भारी रं' असं असून त्याचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या सक्सेसनंतर कलर्स मराठी वाहिनीचे हेड केदार शिंदे 'बाईपण भारी रं' ही मालिका घेऊन सज्ज झाले आहेत. या प्रोमोमध्ये "हा कोणताही रिएलिटी शो नाही तर ही रिएलिटी आहे. ही तिने गिरवलेली मुळाक्षरांची पाटी आहे. दिसला तर आरसा नाहीतर जसला आहे. या कथा तुमच्या आहेत...तुमच्यातील आहेत. आई, बहीण, सासू, मावशी आणि जीवाभावांच्या सगळ्या मैत्रिणींना कळवा...कलर्स मराठी घेऊन येत आहे आपल्या कथा...एकाच झटक्यात संपणाऱ्या तरीही पुढच्या कथेची वाट बघायला लावणाऱ्या...", असं म्हटलं गेलं आहे. प्रोमो पाहून मालिकेबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. 

'बाईपण भारी रं' बरोबरच महाराष्ट्राच्या मातीतील एक भन्नाट लव्हस्टोरीही दाखवणारी 'लय आवडतेस तू मला' ही मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कलर्स मराठीबरोबरच इतर मराठी वाहिन्यांवरही प्रेक्षकांना नव्या मालिका पाहायला मिळणार आहेत. झी मराठीवर 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 'लक्ष्मी निवास' ही मालिकाही लवकरच सुरू होणार आहे. तर स्टार प्रवाह वाहिनीवरही 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत', 'उदे गं अंबे'  या मालिका येत्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

टॅग्स :कलर्स मराठीटिव्ही कलाकार