Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजय-शाहरुखमधील शीतयुद्ध संपले

By admin | Updated: October 28, 2014 00:22 IST

अजय देवगण आणि शाहरुख खान या स्टार कलावंतांमधील शीतयुद्ध अखेर संपले आहे. शाहरुखचा ‘हॅप्पी न्यू इअर’ नुकताच रिलीज झाला.

अजय देवगण आणि शाहरुख खान या स्टार कलावंतांमधील शीतयुद्ध अखेर संपले आहे. शाहरुखचा ‘हॅप्पी न्यू इअर’ नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात अजयच्या ‘अॅक्शन ज्ॉक्सन’ या आगामी चित्रपटाचे ट्रेलर दाखविण्यात आले. दोघांमधील वितुष्ट संपुष्टात आल्याचे यावरून सिद्ध होते, असे जाणकारांचे म्हणणो आहे. शाहरुखच्या ‘जब तक है जान’ सोबत अजयचा ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट रिलीज झाला होता. जास्तीत जास्त चित्रपटगृहांमध्ये ‘जब तक है जान’ दाखवला जावा, यासाठी यशराज फिल्मस्ने वितरकांवर दबाव आणला होता. अजयने त्याला कडाडून विरोध केला होता. तेव्हापासून त्यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले.