Join us

कोब्रासोबत व्हिडीओ, टीव्ही अभिनेत्रीला अटक

By admin | Updated: February 9, 2017 10:41 IST

काही महिन्यांपूर्वी रसिकांच्या भेटीला आलेली छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'नागार्जुन एक योद्धा'मधील अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 09 - काही महिन्यांपूर्वी रसिकांच्या भेटीला आलेली छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'नागार्जुन एक योद्धा'मधील अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर श्रुतीचा कोबरा सापाबरोबरचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. बुधवारी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्रुती उल्फतसह चार जणांना अटक केले आहे. वन्य जीव अधिनियमाचे उल्लंघन  केल्याच्या आरोपाखाली या चार जणांना अटक करण्यात आली आहे. श्रुती उल्फतसह मालिकेतील आणखी एक अभिनेत्री आणि प्रोडक्शनमधील दोन व्यवस्थापकांना अटक करण्यात आले आहे. डीएनएच्या वृत्तानुसार काही पशु कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर मुंबई प्रादेशिक विभागाच्या वन अधिकाऱ्यांनी अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक केली आहे. तसेच त्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ ऑक्टोबर 2016 मध्ये मालिकेच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला होता. श्रुती उल्फतने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे तो अधिकच व्हायरल झाला. व्यवस्थापन टीमच्या मते कोब्रा सापाच्या चित्रणाचा  व्हिडिओ स्पेशल इफेक्टसचा वापर करुन केला तयार केला आहे. त्यामध्ये कोणताही जिवंत अथवा मृत साप नाही. दरम्यान, वन विभागाने सोशल मीडियावरील तो व्हिडीओ डाऊनलोड करुन कलिना येथिल फॉरेंसिक लॅबला परिक्षणासाठी पाठवला होता. 17 जानेवारी रोजी त्याचा रिपोर्ट मिळाला त्यामध्ये व्हिडीओ मध्ये जिंवत साप वापरण्यात आल्याचे दिसून आले. काल चारही जणांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

 

नागार्जुन एक योद्धा या मालिकेत निकेतन धीर, पूजा बॅनर्जी, चेतन हंसराज, मनीष वाधवा, किशोरी शहाणे आणि श्रुती उल्फत कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.