Join us

स्पृहाचा ‘क्लास’

By admin | Updated: November 13, 2014 00:03 IST

एखाद्या अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्वाचा ‘क्लास’ तिच्या आवडी-निवडीवरून ठरवायचा झाल्यास आपली मराठमोळी डिंपल गर्ल स्पृहा जोशीचा क्रमांक वरचा ठरेल.

एखाद्या अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्वाचा ‘क्लास’ तिच्या आवडी-निवडीवरून ठरवायचा झाल्यास आपली मराठमोळी डिंपल गर्ल स्पृहा जोशीचा क्रमांक वरचा ठरेल. अत्यंत खोडकर आणि आकर्षक स्पृहाचा चोखंदळपणा दिवसें-दिवस वाढतच चालला आहे. तिच्या कवी मनामुळे की काय गेल्या काही दिवसांपासून तिचा आत्मविश्वास वाढला आहे. तिच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीतूनच तिचा चोखंदळपणा स्पष्ट होईल. तिच्या आवडत्या अभिनेत्रींमध्ये रेखा व दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा समावेश आहे. या दोघींचा प्रत्येक चित्रपट स्पृहा पुन्हा-पुन्हा पाहत असते. त्यांचा या चित्रपटातील अभिनय, देहबोली यांचा ती सध्या बारकाईने अभ्यास करीत आहे.