Join us

सेक्स सीनवरुन चित्रांगदा भांडली, चित्रपट सोडला

By admin | Updated: June 14, 2016 13:58 IST

अभिनेत्री चित्रांगदा सिंहने कुशन नंदीचा 'बाबूमोशाय बंदूकबाज' चित्रपट सोडून दिला आहे. सेक्सदृश्य चित्रीत होत असताना चित्रांगदाचे दिग्दर्शक कुशनबरोबर भांडण झाले.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १४ - अभिनेत्री चित्रांगदा सिंहने कुशन नंदीचा 'बाबूमोशाय बंदूकबाज' चित्रपट सोडून दिला आहे. सेक्सदृश्य चित्रीत होत असताना चित्रांगदाचे दिग्दर्शक कुशनबरोबर भांडण झाले त्यामुळे तिने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 
 
चित्रांगदा आणि नवाझुद्दीन सिद्दीकीवर सेक्स सीनचा पहिला टेक चित्रीत झाला. पण तो टेक दिग्दर्शकाला आवडला नाही. नवाझ जोराने चित्रांगदाला बेडवर खेचतो आणि आपल्याला कोणीतरी पाहतेय असे दोघांच्या लक्षात येते  असा तो सीन होता. कुशानला तो सीन पसंत पडली नाही. 
 
म्हणून तो चित्रांगदावर ओरडला असे स्पॉटबॉय वेबसाईटने म्हटले आहे. चित्रांगदा आणि कुशनमध्ये जोरदार वादावादी झाली. संपूर्ण युनिटसमोर कुशनचे अशा पद्धतीने बोलणे चित्रांगदाला अजिबात आवडले नाही. भडकलेल्या चित्रांगदाची समजूत घालण्यासाठी कुशनने आपण बाहेर जाऊन बोलूया असे सांगितले. पण संतापलेल्या चित्रांगदाने नकार दिला आणि चित्रीकरण सोडून तिथून निघून गेली.