Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानलं भावा! अभिनेता चिरंजीवी सिनेकर्मचाऱ्यांना आणि पत्रकारांना देणार मोफत लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 15:36 IST

चिरंजीवीने सिनेकर्मचाऱ्यांना आणि पत्रकारांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देया मोहिमेअंतर्गत सिनेकर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नीला मोफत लस देण्यात येणार आहे.

अभिनेता चिरंजीवी हा समाजसेवा करण्यासाठी नेहमीच पुढे असतो. आता तो पुन्हा एकदा खूप चांगले काम करत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव भारतात मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे लसीकरण जलदगतीने व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता चिरंजीवीने सिनेकर्मचाऱ्यांना आणि पत्रकारांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.

चिरंजीवीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की, तो कोरोना क्रायसिस चॅरिटी संघटना आणि अपोलो हेल्थच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम राबवणार आहे. या मोहिमेअंतर्गत सिनेकर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नीला मोफत लस देण्यात येणार आहे. तसेच सिनेकर्मचाऱ्यांना औषधंही कमी किमतीत दिली जाणार आहेत. ही मोहीम महिनाभर सुरू असणार असून सिनेकर्मचाऱ्यांसोबतच पत्रकारांना देखील मोफत लस देण्यात येणार आहे. 

दाक्षिणात्य अनेक कलाकारांनी सिनेकर्मचाऱ्यांना मदत केली असून बॉलिवूडमधील मंडळींनी देखील सिनेकर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. प्रभास, राम चरण, सलमान खान, सोनू सूद, नागार्जुन, अक्षय कुमार, शाहरुख खान, अमिताभ बच्चन असे विविध कलाकार आजवर मदतीसाठी पुढे आले आहेत. 

टॅग्स :चिरंजीवी