सो शल नेटवर्किं ग साईट टिष्ट्वटरवर अभिनेता ऋषी कपूर यांनी हुमा कुरैशीबद्दल केलेल्या ट्विटमुळे खळबळ झाली. तिचा २८ जुलै रोजी २९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. टिष्ट्वटरवर तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, ऋषी कपूरच्या ट्विटने सर्वांच्या प्रतिक्रिया खेचून आणल्या. ६२ वर्षीय ऋषी कपूर यांनी एक मजेशीर फोटो टाकून ट्विट केले की, ‘द वे यू वे.. द हार्डर यू आर टू किडनॅप. स्टे सेफ. ईट केक!’ या पोस्टमुळे सर्व जण आकर्षित झाले. त्यामुळे ‘दो दुनी चार’ तील अभिनेत्याला माफी मागावी लागली. पण, हुमाने त्यांचे टिष्ट्वट मनावर घेतले नाही. उलट तिने रिटिष्ट्वट केले की, ‘थँक यू.. टू वन आॅफ माय फेव्हरेट चिंटू अंकल फॉर बर्थडे विशेस अॅण्ड लव्ह.. गाईज, इट वॉज अ जोक़.. टेक अ चिलपिल यार...!
चिंटू अंकलचा ‘टिवटिवाट’
By admin | Updated: July 31, 2015 03:29 IST