Join us

बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर नवाज होता केमिस्ट!

By admin | Updated: July 12, 2017 02:25 IST

बॉलिवूडमध्ये ऐशोआरामची लाइफ जगणाऱ्या सुपरस्टार्सनाही स्ट्रगल काही चुकलेले नाहीये

बॉलिवूडमध्ये ऐशोआरामची लाइफ जगणाऱ्या सुपरस्टार्सनाही स्ट्रगल काही चुकलेले नाहीये. या सगळ्यांमध्ये एका अभिनेत्याचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल तो म्हणजे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. आज अनेकांचा लोकप्रिय अभिनेता बनला आहे. मात्र, इंडस्ट्रीत येण्याआधी नवाजुद्दीनचा पहिला जॉब काय होता हे जाणून घेण्याची बऱ्याच जणांना उत्सुकता असेलही, नवाजुद्दीन सिद्दीकी आज बॉलिवूडच्या अनेक दिग्दर्शकांची पहिली पसंत आहे. मात्र, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून यश मिळवलेल्या नवाजुद्दीनला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. सुरुवातीला त्याला केमिस्टच्या दुकानात नोकरी करावी लागली. त्यानंतर सिनेमात येण्याआधी त्यानं वॉचमन म्हणूनही नोकरी केलीय. अभिनयात त्याला आवड होती. संधीसाठी त्याने जवळपास २० वर्ष वाट पाहिली. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सिनेमात स्टेशनवर चोरी करणारा कलाकार आजचा आघाडीचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बनला आहे. मोठी भूमिका मिळेपर्यंत त्याने आपल्या आवडीपोटी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. मात्र, मोठी भूमिका मिळेपर्यंत त्याने जिद्द काही सोडली नाही. एखाद्या गोष्टींमध्ये तुमचा रस असेल तर तुम्ही दहा वर्षे सुद्धा वाट पाहू शकता. त्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीसारखी आवड बाळगा, असे अनेक दिग्गज नवोदिताना आनंदाने सांगताना दिसतात.