भु ताटकीच्या गप्पागोष्टी ऐकण्यात बऱ्याच जणांना रस असतो. अशा प्रकारचे चित्रपटदेखील क्युरिअसली पाहिले जातात. भुतबंगले, हॉन्टेड हाऊस म्हणजे असते तरी काय नक्की? भुतांच्या वास्तव्याने मंतरलेली ती घरे तर नाहीत ना? असे अनेक प्रश्न सहस्यमयी विषयात आवड असलेल्या लोकांना पडले असणारच. आता असेच काही म्हणत आहे मराठी इंडस्ट्रीची ब्यूटी क्वीन पूजा सावंत. अहो ती नुसते म्हणतच नाही, तर चक्क हॉन्टेड व्हीलामध्ये जाऊन राहिली आहे. पूजा सोशल साईट्सवर एक फोटो अपलोड करून सांगते, की हॅड फन इन हॉन्टेड व्हीला इन मॉरिशस. पूजा डायरेक्ट एका हॉन्टेड व्हीलामध्ये पोहोचली आहे अन् तेपण मॉरिशसमधील. तिला भीती वाटायचे तर दूरच; पण ती तिथे जाऊन मजा करीत आहे. आता पूजाला त्या हॉन्टेड व्हीलामध्ये कशी काय मजा आली, हे तिलाच माहीत; पण आपली ही पठ्ठी एवढ्यावर थांबलेली नाही बरं का, तर तिने सर्वांना विचारले आहे, आर यू गाईज रेडी टु मीट द घोस्ट? भुतांना टीव्ही किंवा पुस्तकातच पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी पूजाने चांगलाच प्रस्ताव ठेवला आहे डायरेक्ट भुतांना भेटायचा. हो पूजा सावंत लवकरच सर्वांना भुताची भेट घालून देणार आहे. ते म्हणजे तिच्या आगामी चीटर या चित्रपटातून. पूजा सावंत अन् वैभव तत्त्ववादी यांच्या प्रमुख भूमिका असलेला चीटर हा सिनेमा १० जून रोजी प्रदर्शित होत आहे. अन् या चित्रपटाचे शूटिंग मॉरिशसमधील एका हॉन्टेड व्हीलामध्ये करण्यात आले आहे. आता पूजाचा हा प्रस्ताव स्वीकारून किती जण खरेच हे हॉन्टेड हाऊस पाहायला अन् भुतांना भेटायला जातात ते आपल्याला लवकरच समजेल.
हॉन्टेड व्हिलामध्ये ‘चीटर’चे फन
By admin | Updated: June 4, 2016 01:02 IST