Join us

विद्रुप चेहऱ्यात दिसणार ही कोण आहे? 'चला हवा येऊ द्या'मधून मिळवली लोकप्रियता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:23 IST

'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर या शोमधील अभिनेत्री आता नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'खेळो ती येता...' असं या नाटकाचं नाव असून या हॉरर नाटकात अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे.

'चला हवा येऊ द्या' हा टीव्हीवरील गाजलेल्या कार्यक्रमांपैकी एक. झी मराठीवरील या शोने तब्बल १० वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. त्यानंतर या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. 'चला हवा येऊ द्या' या शोने अनेक नवोदित कलाकारांना संधीही दिली. या शोमधूनच अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. भाऊ कदम, निलेश साबळे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, स्नेहल शिदम या कलाकारांना 'चला हवा येऊ द्या'मुळे लोकप्रियता मिळाली. 

'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर या शोमधील अभिनेत्री आता नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'खेळो ती येता...' असं या नाटकाचं नाव असून या हॉरर नाटकात अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. या दोन अंकी नाटकाच्या पोस्टरमध्ये अभिनेत्रीचा विद्रुप चेहरा दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून स्नेहल शिदम आहे. स्नेहल या नाटकात हाकामारीच्या भूमिका साकारत आहे. या नाटकाचे लेखन समीर सावतं आणि सचिन मेस्त्री यांनी केलं आहे. तर दिग्दर्शन समीर सावंत यांचं आहे. या नाटकाचे प्रयोग सुरू असून प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. 

स्नेहल शिदमला 'चला हवा येऊ द्या' या शोमधूनच लोकप्रियता मिळाली. 'चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल' या पर्वाची ती विजेती होती. त्यानंतर 'चला हवा येऊ द्या' मधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या ती आदिशक्ती या सन मराठीवरील मालिकेतही ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे. 

टॅग्स :चला हवा येऊ द्याटिव्ही कलाकार