Join us  

'कमी बजेट असलं की लोक माझ्याकडे यायचे'; भाऊ कदमने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 6:01 PM

Bhau kadam: स्वभावातील साधेपणामुळे बऱ्याचदा भाऊ कदमला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे.

'चला हवा येऊ द्या'च्या (chala hawa yeu dya) माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे अर्थात भाऊ कदम (bhau kadam). झगमगत्या कलाविश्वात वावरत असतांना स्टारडम मिळत असूनही भाऊने त्याच्यातील साधेपणा जपला आहे. त्यामुळेच आज लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत भाऊ कदमचं नाव आवर्जुन घेतलं जातं.  आज भाऊ यश, संपत्ती, यश सारंकाही उपभोग आहे. मात्र, त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. एक काळ असा होता जेव्हा त्याला फक्त कमी बजेट असलेल्या सिनेमांच्याच ऑफर यायच्या.

सध्या सोशल मीडियावर 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात त्यावेळी अभिनेता वैभव मांगले आणि भाऊ कदम यांनी हजेरी लावली होती. यावेळी अवधूत गुप्तेने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरं देत असताना भाऊ कदमने त्याला कलाविश्वात आलेल्या अनुभवाविषयी भाष्य केलं. 

साध्या पद्धतीने पार पडला होता भाऊ कदमचा लग्नसोहळा; बऱ्याच वर्षांनी फोटो आले समोर

"बरेचदा असं व्हायचं की काही जण होते जे म्हणायचे, भाऊ चांगला चित्रपट आहे, चांगलं कॅरेक्टर आहे. पण, बजेट थोडं कमी आहे. मला कळत नाही कमी बजेटवालेच मला का भेटतात. मला याचच वाईट वाटतं. की मित्रांसाठी किती करत राहायचं. आतापर्यंत करत आलो, अजूनही आता करत राहायचं. माझी काही आर्थिक प्रगती होतच नाहीये. सतत मला वाटायचं की हे माझ्याच बाबती का घडतंय. कमी बजेट असलं की लोक माझ्याकडे यायचे. बरं ते काम केलं नाही तर ते सुद्धा हातचं जायचं. त्यामुळे ते करणं गरजेचं असतं", असं भाऊ कदम म्हणाला.

'या' कारणामुळे भाऊ कदम आहे डाऊन टू अर्थ; स्वत: केला खुलासा

दरम्यान, भाऊ कदम याने अथक प्रयत्न, मेहनत करुन कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'फू बाई फू', 'चला हवा येऊ द्या' या गाजलेल्या कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेल्या भाऊ कदमने अनेक लोकप्रिय मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'पांडू', 'नशीबवान', 'व्हीआयपी गाढव', 'टाईमपास', 'टाईमपास २', 'सायकल' यांसारख्या सिनेमातही ते झळकला आहे.  

टॅग्स :भाऊ कदमटेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमा