Join us

सेलिब्रिटींचे मतदान

By admin | Updated: October 15, 2014 00:00 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बजावला मतदानाचा हक्कभाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही केले मतदान.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बजावला मतदानाचा हक्क

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही केले मतदान.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे मतदान केले.

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे मतदानानंतरचे सेल्फी.

मतदार यादीत नाव नसल्याने संवदेनशील अभिनेता अतुल कुलकर्णीला लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नव्हते विधानसभा निवडणुकीत मात्र त्याने मुंबईत सकाळीच मतदानाचा हक्क बजावला

भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री रेखाने बुधवारी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेता स्वप्नील जोशीने पत्नीसह मतदान केले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही केले मतदान.

अभिनेता रितेश देशमुखनेही बजावला मतदानाचा हक्क.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मतदान केले.

मतदान प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून प्रत्येकाने तो बजावायलाच हवा असे आवाहन करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मतदान केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही केले मतदान.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह मतदान केले.

माजी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी सहकुटुंब मतदान केले.

लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी यवतमाळ येथे मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री हेमा मालिनी व ईशा देओल यांनीही मतदान केले.

अभिनेता बोमन इराणीने कुटुंबासह केले मतदान.

अभिनेता सलमान खानने मतदान करत सर्व नागरिकांना आपले कर्तव्य बजावायचे आवाहन केले.

सुप्रसिद्ध कवी लेखक गीतकार गुलझार यांनीही मतदानाचा हक्क बजावला.