Join us

बालपणी लैंगिक शोषण झालेल्या सेलिब्रेटी

By admin | Updated: April 10, 2015 00:00 IST

लैंगिक शोषणाचा बळी चार भिंतीच्या आत सुध्दा ठरु शकते याचा प्रत्यय मला १० वर्षाची असताना आला. माझ्या काकानेच माझे ...

लैंगिक शोषणाचा बळी चार भिंतीच्या आत सुध्दा ठरु शकते याचा प्रत्यय मला १० वर्षाची असताना आला. माझ्या काकानेच माझे लैंगिक शोषण केले असल्याचे अभिनेत्री सोफिया हयातने सांगितले होते तेव्हा बॉलिवूडसह अन्य ठिकाणी त्याचे पडसाद उमटले होते.

हॉलीवूड अभिनेत्री ओप्रा विन्फ्रे सुध्दा ९ वर्षाची असताना लैंगिक शोषणाची बळी पडली असल्याची कबूली ओप्राने एका टिव्ही शो कार्यक्रमात दिली होती.

वयाच्या ९ व्या वर्षी आपल्याला लैंगिक शोषणाचा बळी व्हावे लागले होते अशी कबूली दिल्ली-बेल्ली चित्रपटातील अभिनेत्री तसेच चित्रपट निर्माती पूर्णा जगन्नाथन हिने दिली आहे.

सुप्रसिध्द सितारवादक पंडित रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर सुध्दा लैंगिक शोषणाची बळी पडली. आई-वडीलांचा ज्या व्यक्तीवर विश्वास होता त्या व्यक्तीने आपले अनेकदा लैंगि‍क शोषण केल्याचे अनुष्काने सांगितले.

मी केवळ ५ वर्षाची असताना घरातील नोकराने माझे लैंगिक शोषण केले होते अशी धक्कादायक माहिती मूळची पाकिस्तानातील असलेली व सलमान खानची पूर्वाश्रमीची प्रेयसी सोमी अलीने एका मुलाखतीदरम्यान उघड केली.

अवघी ९ वर्षाची असताना माझ्यासोबत एका प्रौढ व्यक्तीने शारिरीक संबंध ठेवले व आपले लैंगिक शोषण केले होते. लैंगिक शोषणाविरुध्द आता आवाज उठवायला हवा असे अभिनेत्री कल्की कोचलीन म्हणते.