Join us

खेड्यातील दाहक वास्तव

By admin | Updated: April 25, 2016 03:19 IST

बरड हा ग्रामीण शब्द आहे. ग्रामीण भाषेत ज्या जागेला बरड म्हणतात, अशा ओसाड माळरानावर अचानक काही तरी काम सुरू होते, गावकऱ्यांमध्ये तर्कवितर्कांना ऊत येतो

बरड हा ग्रामीण शब्द आहे. ग्रामीण भाषेत ज्या जागेला बरड म्हणतात, अशा ओसाड माळरानावर अचानक काही तरी काम सुरू होते, गावकऱ्यांमध्ये तर्कवितर्कांना ऊत येतो, यात स्वार्थाची पोळी भाजून घेणारे समाजकंटकदेखील असतात. ते गावातील भोळ्याभाबड्यांना फसविण्याचे काम करीत असतात. आपापसात भांडणे सुरू होतात, नाती पणाला लागतात आणि यातूनच एकामागोमाग एक घटनांचा उलगडा होत जाणारा हा ‘बरड’ चित्रपट आहे. महाराष्ट्रील अलकुड नावाच्या खेड्यातील ही गोष्ट आहे. या सर्व तर्कविर्तकांना योग्य वळण देणारे गावातील विशेष व्यक्तिमत्त्व असलेले आण्णा याचा पाठपुरावा करतात, असाच वेगळ्या धाटणीचा असा हा ‘बरड’ चित्रपट आहे. खेड्यातील दाहक वास्तव या बरडमध्ये मांडण्यात आले आहे. तानाजी घाडगे दिग्दर्शित हा चित्रपट असून, देवेंद्र कापडणीस लिखित-निर्मित हा चित्रपट आहे. यामध्ये सुहास पळशीकर, राजन पाटील, शहाजी काळे, भारत गणेशपुरे, संजय कुलकर्णी, नंदकिशोर कुलकर्णी या आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.