ऐश्वर्या रॉय, करिना कपूर आणि माधुरी दीक्षित या अभिनेत्रींनंतर आता कॅटरिना कैफचा मेणाचा पुतळा मादम तुसादमध्ये लावण्यात येणार आहे. कॅटरिनाला मॅडम तुसादच्या अधिका:यांकडून एक मेल मिळाला असून, त्यात त्यांनी लंडन म्युङिायममध्ये तिचा मेणाचा पुतळा लावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कॅटच्या निकटवर्तीय मित्रंनुसार कॅटरिनाला याबाबत रविवारी समजले असून ती याबाबत खुश आहे. तिने हा प्रस्ताव स्वीकारला असून तुसाद टीमशी तिची चर्चा सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पुढच्या आठवडय़ात येणार आहे. सर्वकाही ठीक राहिले तर याच वर्षी कॅटरिनाच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण होईल. कॅटरिना सध्या तिच्या लूकबाबत विचार करीत असल्याचे कळते. ती सध्या राजनीतीतील राजकीय नेत्याचा लूक, अजब प्रेम की गजब कहानीमधील शॉर्ट, चेक्ड शर्ट, अग्निपथमधील चिकनी चमेली लूक आणि तीस मार खानमधील शीला की जवानी लूकबाबत ती विचार करीत असल्याचे कळते.
मादम तुसादमध्ये कॅटरिनाचा पुतळा
By admin | Updated: October 12, 2014 00:31 IST