Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींमध्ये ‘कॅटफाईट’

By admin | Updated: April 17, 2017 04:17 IST

आज प्रत्येक क्षेत्रात जोरदार रस्सीखेच, स्पर्धा पाहायला मिळते. पुढे जाण्याची चढाओढ ही प्रत्येक क्षेत्रात असते

- सुवर्णा जैनआज प्रत्येक क्षेत्रात जोरदार रस्सीखेच, स्पर्धा पाहायला मिळते. पुढे जाण्याची चढाओढ ही प्रत्येक क्षेत्रात असते; मग त्याला मनोरंजन जगतसुद्धा अपवाद कसं बरं राहील? इथं तर उलट सर्वाधिक स्पर्धा पाहायला मिळते. जास्तीत जास्त काम आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी कलाकार मंडळी जोरदार प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात अभिनेत्रींमध्येही ही स्पर्धा जरा जास्तच असते. त्यांचं सौंदर्य, अभिनय आणि इतर कलागुण यामुळे या अभिनेत्रींमध्ये काम मिळविण्यासाठी जोरदार स्पर्धा असते. यातूनच अभिनेत्रींमध्ये एकमेकींबद्दल प्रचंड ईर्षा, द्वेष आणि कधी कधी संघर्षसुद्धा पाहायला मिळतो. पेज-थ्री दुनियेच्या शब्दांत सांगायचं झालं तर अभिनेत्रींमध्ये जोरदार कॅटफाईट पाहायला मिळते. रुपेरी पडद्यावरील अभिनेत्रींमधली कॅटफाईट तर जगजाहीर आहे. मग ती दीपिका-कॅटरिना असो किंवा मग आलिया भट आणि श्रद्धा कपूर यांच्यातलं शीतयुद्ध असो. मात्र, अशीच कॅटफाईट छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींमध्येसुद्धा पाहायला मिळते. चला तर मग जाणून घेऊ या छोट्या पडद्यावरील विविध अभिनेत्रींमधील कॅटफाईट.सारा खान आणि मधुरा नाईकअभिनेत्री सारा खान आणि मधुरा नाईक ‘बिदाई’ या मालिकेतील एकमेकींच्या को-स्टार. मात्र, या दोघींमध्ये बिनसलं ते साराचा एक्स-पती अली मर्चंटवरून. अलीला आपण अनेक वर्षांपासून ओळखत असल्याचे मधुराने साराला सुनावले. साहजिकच ही बाब साराला चांगलीच खटकली. त्यामुळे साराने मधुरा आणि सेटवरील इतर कलाकारांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे. आपल्या खासगी प्रेमसंबंधांमध्ये अली मर्चंटने गैरसमज पसरवल्याचा आरोप मधुराने केलाय. शिवाय त्याच्यामुळेच आपले ब्रेकअप झाल्याचा दावाही मधुरानं केलाय. त्यानंतर दोन्ही अभिनेत्री एकमेकींपासून दुरावल्या. गेली तीन वर्षांहून अधिक काळ या अभिनेत्रींमध्ये वाद सुरू होता. मात्र, आता झालं गेलं विसरून जा म्हणत सारानं मधुरापुढे मैत्रीचा हात सरसावल्याचे बोललं जात आहे.देबिना बॅनर्जी आणि रतन राजपूतछोट्या पडद्यावरील ‘संतोषी माता’ या पौराणिक मालिकेत अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही डबल रोल साकारत आहे. मात्र, याच मालिकेतील अभिनेत्री रतन राजपूतशी देबिनाचं पटत नसल्याच्या चर्चा आहेत. मालिकेच्या शूटिंगदरम्यानही दोघी एकमेंकींना टाळतात. पडद्यावर एकमेकींशी वाद घालणाऱ्या या अभिनेत्रींमध्ये पडद्यामागेही खटके उडत असल्याचे चित्र आहे. आपल्या वाट्याला आलेली भूमिका, संवाद दुसरीपेक्षा कमी असल्याचे दोन्ही अभिनेत्रींना वाटतेय. त्यामुळेच दोघींमध्ये जोरदार कॅटफाईट सुरू आहे.मौनी राय आणि करिष्मा तन्ना ‘नागार्जुन एक योद्धा’ या मालिकेत नागीण साकारणारी अभिनेत्री करिष्मा तन्ना आणि छोट्या पडद्यावर रसिकांची लाडकी अभिनेत्री व शिवकन्या साकारणारी ग्लॅमरस नागीण म्हणजेच मौनी राय. छोट्या पडद्यावर नागीण साकारणाऱ्या या अभिनेत्री एकेकाळच्या जिवाभावाच्या मैत्रिणी. मात्र, नागीण साकारता-साकारता या दोघींच्या मैत्रीला जणू काही डंख मारला गेला आहे. दोघींमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे ऐकायला मिळत आहे. दोघींमधील या वादाला कारणीभूत ठरलं ते एका पुरस्कार सोहळ्यातील दोघींची फॅशन स्टाईल. करिष्मा आणि मौनी यांचा फॅशन स्टायलिस्ट एकच व्यक्ती आहे. करिष्माने या पुरस्कार सोहळ्यासाठी आकर्षक असा ड्रेस निवडला. त्यानंतर मौनीला या फॅशन स्टायलिस्टनं करिष्मासारखाच ड्रेस दिला. त्यामुळे दोघींसुद्धा अगदी हुबेहूब स्टाईलच्या ड्रेसमध्ये या पुरस्कार सोहळ्यात अवतरल्या. मग काय, इथूनच दोघींमध्ये एकमेकींबद्दल असूया निर्माण झाली. तेव्हापासून दोघी मैत्रिणी पक्क्या वैरी बनल्याचे ऐकू येतंय.तान्या शर्मा आणि सोनम लांबाछोट्या पडद्यावरील ‘साथ निभाना साथियाँ’ मालिकेतील तान्या आणि सोनम या बहिणी. तान्या या मालिकेत मीरा, तर सोनम विद्या ही भूमिका साकारत आहे. पडद्यावर या दोघींची मतं वेगवेगळी आहेत, हे साऱ्यांनी पाहिलंच आहे. मात्र, रियल लाइफमध्येसुद्धा दोघींमध्ये आॅल इज वेल नाही. दोघींमध्ये सेटवर खटके उडाल्याचे ऐकायला मिळत आहे. दोघींनी आपल्या करिअरची नुकतीच सुरुवात केली आहे. काही मालिकांमध्ये त्यांनी कामं केली आहेत. त्यामुळे दोघींमध्ये नवे प्रोजेक्ट मिळविण्यासाठी खटके उडणं, स्पर्धा निर्माण होणं, ईर्षा निर्माण होणं हे स्वाभाविक असल्याचं बोललं जात आहे.