Join us  

कॅटला करायचंय पॅचअप, रणबीरची ना-ना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2016 3:11 PM

कतरिना कैफ अद्यापही रणबीरच्या प्रेमात असून तिला त्याच्याशी पॅचअप करण्याची इच्छा आहे, रणबीर मात्र पॅचअपच्या मूडमध्ये नसून आपण यातून बाहेर पडल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - बॉलिवूडमधील क्युट कपल रणबीर-कतरिनाच्या ब्रेकअपमुळे त्यांचे चाहते खूप दुखावले असून त्या दोघांनी परत यावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र या दोघांचेही मार्ग आता वेगळे झाल्याचे दिसत आहे. दरम्यान कतरिना कैफ अद्यापही रणबीरच्या प्रेमात असून तिला त्याच्याशी पॅचअप करण्याची इच्छा आहे, रणबीर मात्र पॅचअपच्या मूडमध्ये नसून आपण यातून बाहेर पडल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मैत्रिणीच्या पार्टीत रणबीर व कतरिना दोघेही पण स्वतंत्ररित्या उपस्थित होते. थोडा वेळ मित्रांसोबत घालवल्यानंतर कतरिनाने रणबीरजवळ जाऊन त्याच्याशी खासगीत बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र रणबीरने त्यास स्पष्टपणे नकार देत जे काही बोलायचे असेल ते सर्वांसमोर बोल, असे तिला सांगितले.
रणबीरच्या वर्तनामुळे दुखावल्यानंतरही कतरिनाने त्याला सर्वांसमोरच पुन्हा एकत्र येण्याविषयी विचारणा केली असता, रणबीरने त्यालाही नकार दर्शवला. ' माझ्यासाठी हे नातं संपलं आहे. मी या नात्यातून बाहेर पडलो आहे आणि तूही तसंच करावं असं मला वाटतं' अशा स्पष्ट शब्दात रणबीरने तिचा प्रस्ताव धुडकावून लावला.
सर्वांसमोर झालेला अपमान आणि परत एकत्र येण्याची उरलीसुरली आशाही संपुष्टात आल्याने कतरिना अतिशय दुखावली गेली असून पार्टीतील उपस्थितांनाही रणबीरच्या या वर्तनामुळे धक्का बसला.