Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत शाहरुख चौकशीच्या फे-यात, ईडीने केली चौकशी

By admin | Updated: November 11, 2015 13:50 IST

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या खरेदीप्रक्रियेत परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शाहरुख खानची तीन तास कसून चौकशी केली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ - आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या खरेदीप्रक्रियेत परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शाहरुख खानची तीन तास कसून चौकशी केली. चौकशीत शाहरुखने नियमांचे उल्लंघन झालेले नाही असा दावा केला आहे.

आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे मालकी अधिकार शाहरुखच्या रेड चिलीजकडे आहे. यात जुही चावलाचा पती जय मेहता यांचीही भागीदारी आहे. शाहरुखने नाइट रायडर्सचे शेअर ६ ते ८ पट कमी किंमतीत विकल्याचा आरोप असून याप्रकरणी ईडीने शाहरुख खानला तीन वेळा समन्स बजावला होता. मंगळवारी ईडीने शाहरुखची तीन तास चौकशी केली. शाहरुखने चौकशीत सहकार्य केले असून त्याने खरेदीप्रक्रियेतील काही कागदपत्रही ईडीसमोर सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.