Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धूम

By admin | Updated: May 23, 2016 19:14 IST

अॅक्शन फिल्म अनेकदा लोकांच्या पसंतीस उतरतात. अॅक्शन सिनेमे पाहणारा एक वेगळा असा प्रेक्षकवर्ग आहे.

 ऑनलाइन लोकमत

अमेरिका, दि. 23- अॅक्शन फिल्म अनेकदा लोकांच्या पसंतीस उतरतात. अॅक्शन सिनेमे पाहणारा एक वेगळा असा प्रेक्षकवर्ग आहे. कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर या सिनेमालाही जगभरातल्या प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.
2016मधला जगातला सर्वाधिक कमाई केलेला हा चित्रपट ठरला आहे. जगभरात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 1 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. एवढा कमाई करणारा तो 25वा सिनेमा ठरला आहे. अमेरिकेत या सिनेमानं फक्त 14 दिवसांत आतापर्यंत 314 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमानं 23 दिवसांत 677 दशलक्ष डॉलरच्या कमाईचा टप्पा गाठला आहे. डिझ्नी स्टुडिओच्या माहितीनुसार 2016मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. याआधी एव्हेंजर, एव्हेंजर: ऐज ऑफ एल्ट्रान आणि आयर्न मॅन 3 या सिनेमांनी सर्वाधिक कमाई केली आहे.