Join us
Daily Top 2Weekly Top 5

घोड्यासोबत भाईजानची ‘रेस’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 03:00 IST

कुण्या व्यक्तीला घोड्यासोबत शर्यत लावताना तुम्ही पाहिलेय? घोड्यासोबत रेस लावणाऱ्यास अनेक जण वेड्यात काढतील

मुंबई- कुण्या व्यक्तीला घोड्यासोबत शर्यत लावताना तुम्ही पाहिलेय? घोड्यासोबत रेस लावणाऱ्यास अनेक जण वेड्यात काढतील, पण भाईजान सलमान खानची बातचं काही न्यारी. त्याने चक्क घोड्यासोबत शर्यत लावली आणि विशेष म्हणजे, या शर्यतीत जिंकलाही. सध्या या अनोख्या शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कधी शूट झाला, हे माहित नाही. पण सध्या या व्हिडिओने सगळ्यांना वेड लावलेय, इतके मात्र नक्की. तसेही सलमान खान वर्कआऊटच्या बातमीत वेगवेगळ्या गोष्टी करतो. याचाच एक भाग म्हणजे, ही घोड्यासोबतची शर्यत. व्हिडिओत सलमान आणि घोड्यासोबत धावताना दिसतो आणि घोड्याच्या अगदी काही क्षण आधी फिनिश लाईनपर्यंत पोहोचतो, असे दिसतेय. या व्हिडिओच्या मागे ‘सुल्तान’मधील गाणे वाजतेय. त्यामुळे हा व्हिडिओ ‘सुल्तान’च्या शूटवेळी शूट केला गेलेला नक्कीच नाही. व्हिडिओतील सलमानचे लूक बघता, अलीकडेचं तो शूट झाला असावा असे दिसतेय. पण व्हिडिओतील थरार निश्चितपणे पाहण्यासारखा आहे. सलमानने अनेक चित्रपटांत घोडेस्वारी केली आहे. अलीकडे आलेल्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातही तो घोडेस्वारी करताना दिसला होता. आता तर तो घोड्यांसोबत शर्यतही करायला लागला आहे.