Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्राइडल पार्टीत प्रियांका चोप्राने घातली तब्बल इतक्या कोटींची ज्वेलरी, आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 16:03 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये ब्राईडल शॉवर पार्टी ठेवण्यात आली होती, ज्याचे फोटो इंटरनेटवर सध्या व्हायरल होताना दिसतायेत.

ठळक मुद्देप्री वेडिंग सेलिब्रेशन पार्टीमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत होती

गेल्या काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये ब्राईडल शॉवर पार्टी ठेवण्यात आली होती, ज्याचे फोटो इंटरनेटवर सध्या व्हायरल होताना दिसतायेत. आपल्या प्री वेडिंग सेलिब्रेशन पार्टीमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत होती. तिने व्हाईट मर्केसा ड्रेस परिधान केला होता आणि त्यासोबत ज्वेलरीसुद्धा घातली होती. या ज्वेलरीची किंमत तुम्हाला माहिती आहे का? प्रियांकाने तब्बल 9. 5 कोटींची ज्वेलरी परिधान केली होती.     

People.comच्या रिपोर्टनुसार प्रियांकाने या फक्शनमध्ये व्हाईट कलरचा गाऊन घातला होता. प्रियांकाने परिधान केलेल्या एकूण ज्वेलरीची किंमत  9.5 कोटी इतकी होती. प्रियांकाने तिचा हा स्पेशल डे मोठ्या धुमधड्याक्यात साजरा केला. 

 प्रियांका व निकच्या लग्नाची तारीख अद्याप जाहिर करण्यात आलेले नाही. पण हे मेड टू बी कपल येत्या डिसेंबर महिन्यात लग्न करणार, असे कळतेय. प्रियांका व निक दोघेही आपले लग्न यादगार बनवू इच्छितात. त्यामुळेच दोघींनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे.प्रियांका व निक दोघांनाही मीडिया आणि गर्दीपासून दूर एक खासगी सोहळा हवा आहे. प्रियांका आणि निकचे लग्न 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर चालणार आहे. दोघे जोधपूरच्या उमेद पॅलेसमध्ये सात फेरे घेणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास