Join us

ब्रेट ली विचारणार ‘भाभीजी घर पर है!’

By admin | Updated: July 29, 2016 02:25 IST

आॅस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रेट लीने ‘एन इंडियन’ या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. हा चित्रपट आॅस्ट्रेलियात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा

आॅस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रेट लीने ‘एन इंडियन’ या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. हा चित्रपट आॅस्ट्रेलियात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळालेला आहे. आता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ब्रेट ली भारतात आला आहे. ब्रेट ली त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत करणार आहे. या मालिकेसाठी त्याने नुकतेच चित्रीकरण केले. या मालिकेची संपूर्ण टीम ब्रेट लीला भेटून खूपच खूश झाली आहे.