सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चर्चेत येण्याचा आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्याचा सेलिब्रिटी नेहमीच प्रयत्न करत असतात. यासाठीच एका मॉडेलने चक्क भर रस्त्यातच अंघोळ केली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मॉडेल अंगाला पांढरा टॉवेल बांधून आल्याचं दिसत आहे. त्यानंतर भर रस्त्यातच ती केसाला शॅम्पू लावून अंघोळ करते. शॅम्पू लावलेल्या केसांवर रस्त्यावरीलच एका माणसाला ती बाटलीतून पाणी ओतायला सांगत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. मॉडेलचे हे कृत्य पाहून रस्त्यावरील लोकही आश्चर्याने तिच्याकडे पाहत आहेत. अंघोळ झाल्यानंतर ती रस्त्यावरच गाडीच्या आरशात पाहून मेकअपही करते.
हे सगळं कमी म्हणून की काय रस्त्यावरच मॉडेल कपडेही बदलताना दिसत आहे. पण, ट्विस्ट म्हणजे तिने आधीपासूनच मिनी ड्रेस घातलेला होते. आणि त्यावर फक्त टॉवेल गुंडाळला होता. पण, जेव्हा ती टॉवेल काढून कपडे बदलण्यासाठी बॉडीगार्डच्या मागे गेली तेव्हा मात्र रस्त्यावरील सगळेच आश्चर्याने तिच्याकडे पाहत होती. पण, नंतर लगेचच हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या या मॉडेलचं नाव इनग्रिड ओहारा असं आहे. ओहारा ही ब्राझिलची २७ वर्षीय अभिनेत्री आहे. ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील आहे. 'अस गेमेस'(2019), 'स्ट्रँडेड' (2021) आणि 'द सायलंट वन' यांसारख्या काही सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.