Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचे नाव तैमूर का ठेवलं? सैफचा खुलासा

By admin | Updated: January 17, 2017 18:07 IST

महिनाभराच्या शांततेनंतर सैफ अली खानने घराण्याच्या नव्या वारसदाराचं नाव तैमूर अली खान पतौडी का ठेवलं याचा खुलासा केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 - अभिनेत्री करिना कपूर-सैफ अली खान यांनी आपल्या बाळाचे नाव तैमूर ठेवल्यानंतर शुभेच्छा देणाऱ्या नेटिझन्सनी नावावर आक्षेप घेत खिल्ली उडवली होती. महिनाभराच्या शांततेनंतर सैफ अली खानने घराण्याच्या नव्या वारसदाराचं नाव तैमूर अली खान पतौडी का ठेवलं याचा खुलासा केला आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफने आपल्या बाळाचं नाव ठेवण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे.
 
तैमूर हे पर्शियन भाषेतील अत्यंत जुनं नाव आहे. तैमूरचा अर्थ लोह किंवा लोखंड असा होतो. मला आणि करिनाला या शब्दाचा उच्चार आणि अर्थ भावला. आम्ही काढलेल्या असंख्य नावांपैकी तिला हेच सगळ्यात जास्त आवडलं असे सैफ अली खानने मुलाखतीत सांगितलं आहे..
 

तैमूर नावाला विरोध करणा-यांवर ऋषी संतापले

माझ्या बाळाचं नाव तुर्की राज्यकर्त्यावरुन ठेवण्यात आलेलं नाही. मला त्या राजाविषयी पूर्ण माहिती आहे. त्याचं नाव तिमूर होतं, माझ्या मुलाचं नाव तैमूर आहे. कदाचित नावाचा उगम एकच असेल, पण नाव सारखं नाही.