Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकरूपाने प्रियंका येणार चाहत्यांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 03:01 IST

ट्विंकल खन्ना, ऋषी कपूर, आयुष्यमान खुराणा, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या यादीत आता प्रियांका चोप्रा हिचे नावही सामील झाले आहे.

मुंबई- ट्विंकल खन्ना, ऋषी कपूर, आयुष्यमान खुराणा, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या यादीत आता प्रियांका चोप्रा हिचे नावही सामील झाले आहे. होय, प्रियांका आता अभिनयासोबतचं साहित्याच्या दुनियेतही पाऊल ठेवतेय. प्रियांकाने तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासादरम्यानच्या अनेक आठवणी, अनुभव शब्दबद्ध केल्या आहेत आणि त्या पुस्तकरूपात आपल्याला लवकरचं वाचायला मिळणार आहेत. ‘अनफिनिश्ड’ असे तिच्या या पुस्तकाचे नाव असेल. यात प्रियांकाच्या आठवणी, तिच्या आयुष्यातील काही घटना आणि बऱ्या वाईट अनुभवांचा संग्रह यात असेल.पुढील वर्षी प्रियांकाचे हे पुस्तक बाजारात उपलब्ध असेल. आजपर्यंत प्रियांका ज्या विषयांवर कधीच बोलली नाही, त्या विषयांवर ती यात लिहिणार आहे. पेंग्विन रँडम हाऊस इंडिया या पुस्तकाचे प्रकाशक असतील. अलीकडे पेंग्विनने या पुस्तकाची घोषणा केली. पेंग्विनच्या मते, प्रियांकाच्या या पुस्तकातील शब्द मुलींना स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरणादायक ठरतील. केवळ भारतातचं नाही तर अमेरिका आणि ब्रिटनमध्येही हे पुस्तक प्रकाशित होईल. निश्चितपणे प्रियांकाच्या या पुस्तकाची घोषणा होताच, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.