Join us  

"अनिलने माझ्याशी बोलणं बंद केलंय" बोनी कपूर यांचा खुलासा; दोन भावांमध्ये कशावरुन भांडण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 11:05 AM

अनिल कपूरने आतापर्यंत भावाच्या अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पण आता त्यांच्यात नक्की काय बिनलसं?

अनिल कपूर (Anil Kapoor) आणि बोनी कपूर (Boney Kapoor) दोघंही सख्खे भाऊ. बोनी कपूर निर्माते तर अनिल कपूर अभिनेता. अनिल कपूरने आतापर्यंत भावाच्या अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'रुप की रानी चोरो का राजा' पासून ते 'नो एन्ट्री'. 2005 साली आलेला 'नो एन्ट्री' (No Entry) कॉमेडी सिनेमा सुपरहिट झाला होता. सलमान खान, फरदीन खान, अनिल कपूर या तिघांनी काम केलं होतं. सिनेमा खरोखरंच धमाल होता. आता 'नो एन्ट्री'चा सीक्वेलही येणार आहे. मात्र यात अनिल कपूर नसणार आहे. अनिल कपूरने बोनी यांना मला सिनेमात घे असं सांगितलं पण बोनी यांनी नकार दिला. तेव्हापासून अनिल कपूरने भावाशी बोलणंच बंद केलं आहे.

बोनी कपूर यांनी 'झूम'शी बातचीत करताना हा खुलासा केला. नो एन्ट्री ची कास्ट लीक झाली तेव्हापासून अनिल कपूर माझ्याशी बोलत नाहीए असं ते म्हणाले. या सीक्वेलमध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अनिल कपूर यांना घेण्यात आलं आहे. ते म्हणाले, "मी अनिलला नो एन्ट्रीच्या सीक्वेलबद्दल सांगणार त्याच्याआधीच बातमी पसरली होती. त्याला खूप राग आला होता. मला माहित आहे की त्याला सिनेमात काम करायचं होतं पण  जागा नव्हती. मी त्याला हेच सांगणार होतो पण त्याआधीच त्याला बाहेरु समजलं."

ते पुढे म्हणाले, "वरुण आणि अर्जुन चांगले मित्र आहेत. त्यांची केमिस्ट्री यात दिसू शकते आणि दिलजीतही आज स्टार आहे. त्याचा चाहतावर्ग आहे. मला सिनेमा आजच्या काळातील कलाकारांना घेऊन बनवायचा आहे म्हणून मी ही कास्टिंग केली. पण आता माझा भाऊ माझ्याशी नीट बोलतच नाहीए. मला आशा आहे लवकरच सगळं ठीक होईल."

रिपोर्ट्सनुसार, 'नो एन्ट्री 2' चं शूटिंग  डिसेंबर 2024 पासून सुरु होईल. तर पुढील वर्षी सिनेमा रिलीज होईल. सिनेमात अभिनेत्री कोण असणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर यायची आहे.

टॅग्स :बोनी कपूरअनिल कपूरबॉलिवूडपरिवार