Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा डंका कायम राहणार? 'डंकी' पाहताच काय म्हणाले बोमन इराणी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 19:54 IST

बॉलीवूड इंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेता बोमन इराणी यांनी 'डंकी'बाबत मोठं अपडेट दिलं आहे.

पठाण आणि जवान च्या ब्लॉकबस्टरनंतर आता शाहरुख खानच्या पुढील चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. किंग खानचा आगामी चित्रपट डंकी आहे. 'डंकी' हा शाहरुख खानचा या वर्षातील तिसरा चित्रपट आहे.  एकाच वर्षात किंग खानचा तिसरा चित्रपट पाहायला मिळणार असल्याने चाहते खूप उत्साहित आहेत. पठाण आणि जवानप्रमाणेच डंकी बॉक्स ऑफिस गाजवणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता याचे उत्तर मिळाले आहे. 

बॉलीवूड इंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेता बोमन इराणी यांनी 'डंकी'बाबत मोठं अपडेट दिलं आहे. बोमन इराणी यांनी 'डंकी' हा चित्रपट पाहिला असून तो धुमाकूळ घालणार असं त्यांनी म्हटलं. पठाण आणि जवान प्रमाणेच 'डंकी'ही बॉक्स ऑफिसवर देखील उल्लेखनीय कामगिरी करेल, असे ते म्हणाले. 

'डंकी'चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून चित्रपटाचे लेखन हिरानी, अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांनी केले आहे. तर कलाकारांमध्ये शाहरुख खान, तापसी पन्नू, धर्मेंद्र आणि विकी कौशल यांचा समावेश आहे. या चित्रपटाची निर्मिती राजकुमार हिराणी, गौरी खान आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. 

‘डंकी’ची कथा ही आपल्या देश सोडून परदेशात स्थलांतरित झालेल्या लोकांवर बेतलेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ‘डंकी’च्या माध्यमातून शाहरुख खान व राजकुमार हिरानी हे प्रथमच एकत्र काम करणार आहेत. तर हा चित्रपट यावर्षी 22 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. सध्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.  

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटीबोमन इराणी