Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोमन इराणी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, गमावली सगळ्यात जवळची व्यक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 20:00 IST

बोमन इराणी यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

ठळक मुद्देबोमन इराणी यांच्या आईला नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहात आहेत.

बोमन इराणी यांच्या आयुष्यात त्यांच्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे त्यांची आई. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईनेच त्यांच्या आयुष्यात वडिलांची जागा घेतली. त्यांचे घर चालवले. त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या आईचे आज निधन झाले असून त्यांच्या आईच्या निधनाने ते संपूर्णपणे कोलमडले आहेत.

बोमन इराणी यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, माझ्या आईचे 94 व्या वर्षी आज सकाळी झोपेतच निधन झाले. ती 32 वर्षांची असल्यापासून माझ्या आयुष्यात आई-वडील या दोन्ही भूमिका तिनेच साकारल्या. तू अभिनेता आहेस म्हणून लोकांनी तुझे कौतुक नाही केले पाहिजे तर तू त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणतो यासाठी सगळ्यांनी तुझे कौतुक केले पाहिजे असे ती मला नेहमी सांगायची. लोकांना नेहमी आनंदच देत जा... असे ती मला नेहमीच सांगायची. तिने काल रात्री आमच्याकडे आंबा आणि मलाई कुल्फी मागितली. ती आमच्याकडे चंद्र, तारे मागू शकली असती... ती स्वतःच नेहमी एक तारा होती आणि असणार...

बोमन इराणी यांच्या आईला नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहात आहेत.   

टॅग्स :बोमन इराणी