Join us

हॉलिवूड स्टार्सना बॉलिवूडची ओढ

By admin | Updated: September 7, 2015 03:14 IST

बॉलिवूड आणि हॉलिवूडला परस्परांविषयी नेहमी आकर्षण राहिले आहे. वेगळी कथा, दर्जेदार अभिनय, भव्य सेट, थरारक स्टंट या गोष्टींची तुलनाही सातत्याने होत आली आहे

बॉलिवूड आणि हॉलिवूडला परस्परांविषयी नेहमी आकर्षण राहिले आहे. वेगळी कथा, दर्जेदार अभिनय, भव्य सेट, थरारक स्टंट या गोष्टींची तुलनाही सातत्याने होत आली आहे. दोन्हीकडे निर्माण होणाऱ्या अप्रतिम सिनेमांचे रिमेकही तयार झाले आहेत. इतकेच नव्हे, तर भाषेच्या मर्यादा ओलांडून बॉलिवूडच्या कलावंतांनी हॉलिवूड आणि हॉलिवूडच्या कलावंतांनी बॉलिवूड गाजवले आहे. याच क्रमात आता आणखी एक नाव जुडणार आहे. पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सुपरस्टार रजनीकांतच्या ‘रोबोट’चा सिक्वल लवकरच येत असून, यात हॉलिवूडचा सुपरस्टार अर्नोल्ड श्वाजनेगर रजनीकांतसोबत झळकणार आहे. रजनीकांत-अर्नोल्ड चेन्नईच्या स्टुडिओमध्ये दिग्दर्शक शंकरच्या आॅडिओ लाँचसाठी अर्नोल्ड आला असता त्याने शंकरसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखविली होती. अर्नोल्डची ही इच्छा ऐकून शंकरने अर्नोल्डच्या टीमसोबत रोबोटच्या सिक्वलमध्ये काम करण्याबाबत चर्चा केली. शंकरच्या चित्रपटांची पार्श्वभूमी पाहिली असताना हॉलिवूड सुपरस्टारलादेखील हे प्रचंड फायद्याचे ठरणार आहे. या चित्रपटात अर्नोल्ड टर्मिनेटरच्या ‘लूक’मध्ये दिसल्यास आश्चर्य वाटण्याजोगे नसावे.अक्षय कुमार-सिल्व्हेस्टर स्टॅलोन साजिद नाडियादवालाच्या ‘कम्बख्त इश्क’ चित्रपटात सिल्व्हेस्टर स्टॅलोनने काम केले होते. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. याशिवाय अक्षय कुमारने या चित्रपटात डेनिस रिचर्डस्समवेतही काम केले आहे.अमिताभ बच्चन-बेन किंग्जले बेन किंग्जले यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘तीन पत्ती’ या चित्रपटात पर्सी ट्रॅचेनबर्गची भूमिका निभावली होती. ही जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडली होती. कॅटरिना-क्लाईव्ह स्टँडेन ब्रिटिश अभिनेता क्लाईव्ह स्टँडेनने ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटात कॅटरिनाच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली होती.अमीर खान-टॉबी स्टिफन्स ‘डाय अनादर डे’ या हॉलिवूड चित्रपटात भूमिका केलेल्या टॉबी स्टिफन्सने अमीर खानच्या ‘मंगल पांडे: द रायझिंग’ या चित्रपटात कॅप्टन विल्यम गॉर्डनची भूमिका साकारली होती.फरहान अख्तर-रिबेका ब्रीडस् आॅस्ट्रेलियन तारका रिबेका ब्रीडस्ने फरहान अख्तरसोबत राकेश ओमप्रकाश मेहराच्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात काम केले होते. त्यांची पडद्यावरची केमेस्ट्री अगदी भन्नाट होती.