Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडची बेगम बेबो पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणाले,‘तू आता म्हातारी दिसतेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 14:27 IST

करीना कपूर स्वत: इंस्टाग्रामवर नसली तरीसुद्धा तिचे चाहते वेळोवेळी तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नुकतंच तिच्या टीमने पोस्ट केलेल्या दोन फोटोंमुळे बॉलिवूडची बेबो ट्रोल झाली आहे.

बॉलिवूडची बेगम बेबो करीना कपूर खान सोशल मीडियापासून दूर राहते. तरीपण अधूनमधून ती ट्रोल होताना दिसते. करिना तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळे प्रसिद्ध आहे. करीना कपूर स्वत: इंस्टाग्रामवर नसली तरीसुद्धा तिचे चाहते वेळोवेळी तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नुकतंच तिच्या टीमने पोस्ट केलेल्या दोन फोटोंमुळे बॉलिवूडची बेबो ट्रोल झाली आहे.

करीना कपूर सध्या इटलीमधील टस्कनीमध्ये सैफ अली खान व तैमूरसोबत फिरायला गेली आहे. या करीनाच्या टीमने एक सेल्फी शेअर केला आहे. करीनाने उन्हात हा सेल्फी काढला आहे. ३८ वर्षीय या अभिनेत्रीने फ्लोरल प्रिंटचा काळा ड्रेस घातला आहे व सोबतच काळा गॉगलही या फोटोंमध्ये दिसून येतोय. या फोटोंमध्ये करीनाने कोणताही मेकअप केलेला नाही. या फोटोवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी करीनाच्या वयावर बोट ठेवले आहे. जवळून काढलेल्या या फोटोमध्ये करीनाचं वय जास्त दिसतंय असं लोकांनी म्हटलं आहे.

एका युझरने असे म्हटले आहे की, ‘करीना माझी आवडती अभिनेत्री आहे पण, या फोटोमध्ये ती वयस्कर दिसतेय.’ मध्यंतरी बिकिनी घालण्यावरून करीनाला ट्रोल करण्यात आलं होतं. एका मुलाखतीमध्ये सोशल नेटवर्किंगवरील कमेन्टचा त्रास होतो असं सांगताना, चाहत्यांनी कलाकारांना भावनिकदृष्ट्या ग्राह्य धरणं चुकीचं असल्याचं मत करिनाने व्यक्त केले आहे. आम्हालाही हृदय आहे. आम्हालाही भावना आहेत हे चाहत्यांनी लक्षात घ्यायला हवं,’असं मत करिनाने सोशल नेटवर्किंगवरील कमेन्टसबद्दल बोलताना मांडले.

टॅग्स :करिना कपूरतैमुर