Join us  

'लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहा', झीनत अमान यांचा तरुणांना अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:40 AM

स्वत:च्या मुलांनाही हाच सल्ला देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

झीनत अमान (Zeenat Aman) 70 च्या दशकातील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. 'डॉन','सत्यम शिवम सुंदरम','लावारिस' असे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. त्यांचे विचार, दृष्टिकोन तेव्हापासूनच खूप मॉडर्न होता. सिनेमातील त्यांचे लुक्स, फॅशन सगळंच पुढारलेलं होतं. झीनत अमान आता 72 वर्षांच्या आहेत आणि याही वयात त्यांचे विचार अतिशय बोल्ड आहेत. नुकतंच त्यांनी तरुणांना लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहा असाच थेट सल्ला दिलाय. 

झीनत अमान यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर डेब्यू केला. त्यांच्या युनिक पोस्ट सर्वच वयोगटातील नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. त्या कधी सिनेमाच्या जुन्या आठवणी शेअर करतात तर कधी रिलेशनशिपविषयी सल्ले देतात. नुकतंच त्यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिले, "माझ्या शेवटच्या पोस्टमध्ये तुम्ही मला रिलेशनशिपविषयी सल्ला विचारला होता. माझं वैयक्तिक मत असं आहे जे मी आधी कधी शेअर केलं नाही ते म्हणजे तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल तर लग्न करण्याआधी सोबत राहा असं मी अगदी ठामपणे सांगेन. मी हाच सल्ला माझ्या मुलांनाही देते. मला हे खरंच पटतं की दोन जणांनी त्यांच्या नात्यात कुटुंबाला आणण्यापूर्वी त्यांनी आधी नात्याला प्राधान्य द्यावं."

त्या पुढे म्हणाल्या, "दिवसातून काही तास तुम्ही स्वत: आहात तसं राहू शकता. पण तुम्ही बाथरुम शेअर करु शकता का? एकमेकांचा राग झेलू शकता का? रोज रात्री काय जेवायतं यावर तुमचं एकमत होतं का? तुमच्यात शारिरीक नातंही तसंच राहतं का? हजार भांडणांनंतरही दोन जवळच्या लोकांमध्ये नातं कायम राहतं का? थोडक्यात काय तर तुम्ही एकमेकांसाठी योग्य आहात का? मला माहित आहे की भारतीय समाज लग्नाआधी सोबत राहण्याच्या गोष्टीला मान्यता देत नाही. पण समाजाला अशा अनेक गोष्टींवर आक्षेप असतोच. लोक काय म्हणणार?"

टॅग्स :झीनत अमानबॉलिवूडरिलेशनशिपरिलेशनशिपसोशल मीडिया