टीव्ही अॅक्टरसोबत जरीन मॉरिशसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 19:50 IST
करिअरमधील चढउतारामुळे नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री जरीन खान सध्या एका टीव्ही अॅक्टरबरोबर मॉरिशसला गेली आहे; मात्र याठिकाणी ती एन्जॉय ...
टीव्ही अॅक्टरसोबत जरीन मॉरिशसला
करिअरमधील चढउतारामुळे नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री जरीन खान सध्या एका टीव्ही अॅक्टरबरोबर मॉरिशसला गेली आहे; मात्र याठिकाणी ती एन्जॉय करायला नव्हे तर चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली आहे. ‘अक्सर-२’ या चित्रपटाची सध्या मॉरिशसला शूटिंग सुरू असून, टीव्ही अभिनेता गौरम रोडे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. त्यामुळे सध्या दोघेही मॉरिशसमध्ये शूटिंगच्या कामात व्यस्त आहेत. मॉरिशस हे निसर्गरम्य आणि हॉलिडे साजरे करण्यासाठीचे एक उत्तम पर्यटनस्थळ असल्याने जरीन येथील बिचवर चांगलीच धमाल करीत आहे. तिची गौतमसोबत चांगली केमिस्ट्री जुळली असून, दोघेही शूटिंग अविस्मरणीय करण्याच्या प्रयत्नात आहेत. जरीनला स्थानिक जेवणाने अक्षरश: वेड लावले असून, ती दररोज येथील नव्या हॉटेलमध्ये जाणे पसंत करीत आहे. तसेच बिचवर फिरायला जाणेही तिला खूप आवडत आहे. अर्थात तिला गौतमची कंपनी आहेच. या चित्रपटाच्या आॅडिशनसाठी गौतम आणि जरीन सलमानच्या गाण्यांवर परफॉर्म करताना बघावयास मिळाले होते. यामध्ये जरीन खूप हॉट दिसत होती. या चित्रपटातून तिच्या अदा प्रेक्षकांना कितपत भावतील, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.