Join us
Daily Top 2Weekly Top 5

युलिया मुंबईत परतलीय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 17:52 IST

मात्र, दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, त्या दोघांनी ब्रेकअप घेतला असून युलिया कायमचीच रोमानियाला गेली आहे, असे कळाले होते. सत्य काही वेगळंच आहे.

तुम्ही सुपरस्टार सलमान खान आणि युलिया वेंटर यांचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक गोड बातमी आहे. भाईजानची गर्लफ्रेंड युलिया वेंटर ही मुंबईत परतलीय म्हणे. मात्र, दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, त्या दोघांनी ब्रेकअप घेतला असून युलिया कायमचीच रोमानियाला गेली आहे, असे कळाले होते. सत्य काही वेगळंच आहे.खरं वाटत नसेल तर तिचे इन्स्टाग्रामचे अकाऊंट चेक करा. तिने अपडेट केलेल्या फोटोवरून तरी असेच वाटतेय. फोटोत कॉफी मग आणि आॅटोरिक्षा दिसतेय. ती मुंबईत आलीय खरी..पण कशासाठी? तर हेलनच्या बर्थडे पार्टीसाठी. गेल्या आठवड्यातच ती मुंबईत आली आणि आता कदाचित ती दोन तीन दिवस सलमानसोबत वेळ घालवूनच परतेल असे दिसतेय. खरंतर बर्थडे पार्टी वगैरे कारण आहे, तिला केवळ सल्लूमियाँसोबत वेळ घालवायचा होता. यासाठी ती आली होती नाही का? सलमान खान आणि युलिया वेंटर हे दोन वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. फॅमिलीसह ते कधी लाँग ड्राईव्ह तर कधी आऊटिंगला जात असायचे. मात्र, काही दिवसांपूर्वी सलमानने युलिया केवळ माझी चांगली मैत्रीण असल्याचे स्पष्ट केले आहे. असे म्हटल्यावर दुखावलेली युलिया रोमानियाँला नाही तर कुठे जाणार? नाही का..