विद्या बालनच्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. खरे तर ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाला रिलीज होऊन बरेच दिवस झालेत. मग आत्ता हा चित्रपट आठवण्याचे कारण काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो प्रश्न साहजिक आहे. रिलीजनंतर इतक्या दिवसांनी हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटात एक कफ सिरप प्रमोट करताना दाखवण्यात आले आहे आणि हेच या वादाचे मूळ कारण आहे. होय, फूड अॅण्ड ड्रग्ज असोसिएशन (एफडीए)ने चित्रपटात कप सिरप दाखवल्याबद्दल टी-सीरिजला नोटीस पाठवली आहे. टी-सीरिजने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. या कप सिरपमध्ये काही हानीकारक तत्त्व आहेत. याचा आरोग्यावर विपरित परिणाम संभवतो, असे एफडीएने म्हटले आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका जाहिरातीत विद्या बालन या कप सिरपचे प्रमोशन करताना दिसली होती. विद्या रेडिओ स्टेशनमध्ये एक शो होस्ट करत असताना तिला खोकल्याची उबळ येते. यादरम्यान ती हे कप सिरप घेते, असे या जाहिरातीत दाखवण्यात आले होते. ही जाहिरात पाहून डॉ. तुषार जगताप यांनी एफडीएकडे तक्रार दाखल केली होती. एफडीएने या तक्रारीची गंभीर दखल घेत या सिरपची तपासणी केली. यानंतर एफडीएने हे कप सिरप प्रमोट केल्याबद्दल संबंधित प्रॉडक्शन हाऊसला नोटीस पाठवल्याचे कळतेय. यासंदर्भात टी-सीरिजने मात्र हात झटकले आहेत. प्रॉडक्टशी आमचे काहीही देणेघेणे नाही. यासाठी संबंधित ब्रॉन्ड जबाबदार आहे, असे टी सीरिजचे अध्यक्ष विनोद भानुशाली यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणात पुढे काय होते, हे बघूच. तोपर्यंत प्रतीक्षा.
ALSO READ : Tumhari Sulu Review : गृहिणींची सुपरहिरो म्हणजेच ‘तुम्हारी सुलु’!
विद्या या चित्रपटात एका रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसली होती. रात्रीचा शो होस्ट करणारी आरजेची कथा यात दिसली होती. यापूर्वी ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटातही विद्याने आरजेची भूमिका साकारली होती.
‘तुम्हारी सुलू’ सापडला वादात! एफडीएने पाठवले नोटीस!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 12:55 IST