मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघाचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी मंगळवारी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटली येथे लग्न केल्याने त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शाक्य यांनी कोहलीचे नाव न घेताच म्हटले होते की, ‘एका मोठ्या क्रिकेटपटूने नुकतेच लग्न केले. मात्र त्याला भारतासारख्या मोठ्या देशात लग्नासाठी जागा मिळाली नाही काय? एका खेळाडूसाठी आपल्या मायभूमीचे महत्त्व नाही काय? त्यामुळे तो देशभक्त असू शकत नाही.’ शाक्य यांनी मंगळवारी प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी हे वक्तव्य केले होते. शाक्य यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाने या प्रकरणापासून चार हात दूर राहणे
}}}} ">Attention-
To all ‘Young Men/Women’ in India.
Pl take prior approval from BJP for-:
1. Deciding whom to marry;
2. Deciding the venue of marriage;
3. Deciding the nature of festivities;
4. Deciding the food menu.
Thank You.
PS- Issued in Public Interesthttps://t.co/1ePjsuCCJV— Randeep S Surjewala (@rssurjewala) December 20, 2017
भाजपा प्रवक्ता रजनीश अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, विरुष्काप्रकरणी शाक्य यांनी केलेले वक्तव्य त्यांचे व्यक्तिगत आहे. या प्रकरणाशी भाजपाला काहीही देणेघेणे नाही. तर प्रदेश कॉँग्रेस अध्यक्ष अरुण यादव यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हटले की, ‘भाजपा नेत्यांना जेव्हा त्यांचे अपयश लपवायचे असते, तेव्हा ते अशाप्रकारचे बेताल वक्तव्य करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करीत असतात. सध्या देशात हेच सुरू आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी गेल्या ११ डिसेंबर रोजी इटली येथे लग्न केले. त्याकरिता त्याने श्रीलंका दौºयातून सुट्टी घेतली होती.
दरम्यान, हे नवदाम्पत्य हनिमून उरकून नुकतेच भारतात परतले असून, त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर अजूनही शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. या दोघांच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन दिल्ली आणि मुंबई येथे होणार आहे. त्यानंतर विराट दक्षिण आफ्रिकेच्या दौºयावर रवाना होणार आहे. तर अनुष्का आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.