Join us
Daily Top 2Weekly Top 5

गौरी खानच्या या ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही व्हाल अवाक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 12:37 IST

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटल्यावर त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा ही होणारच नाही का? त्यांच्या कॉस्च्युमपासून ते त्यांच्या कारपर्यंत सगळ्यांचीच चर्चा ही ...

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटल्यावर त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा ही होणारच नाही का? त्यांच्या कॉस्च्युमपासून ते त्यांच्या कारपर्यंत सगळ्यांचीच चर्चा ही होताना दिसते. सेलिब्रिटींच्या फॅन्सना देखील या सर्व बाबी जाणून घेण्याची उत्सुकता असते. अलिकडेच अमिषा पटेल एक महागडी पर्स हातात घेऊन एअरपोर्टवर जाताना दिसली. तिची ती महागडी पर्स काही माध्यमांच्या नजरेतून सुटली नाही. मग काय ? तिचा सगळा हिशोब मांडून सगळे मोकळे देखील झाले. तसेच शिल्पा शेट्टी काही दिवसांपूर्वी तिने गळयाभोवती गुंडाळलेल्या महागड्या स्कार्फ मुळे चर्चेत आली होती. आता तुम्ही म्हणाल या सगळयांचे इथे काय? तर होय, नुकत्याच पार पडलेल्या ‘व्होग वुमन आॅफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यामध्ये शाहरुख खानने सपत्नीक हजेरी लावली होती.                                    इंडस्ट्रीतील बरेच प्रसिद्ध चेहरे सुद्धा या पुरस्कार सोहळ्यामध्ये आले होते. बी- टाऊन आणि काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या गर्दीतही सर्वात लक्षवेधी ठरली ती म्हणजे शाहरुख खानची पत्नी गौरी खान. ऐश्वर्या राय बच्चन, श्वेता नंदा, क्रिती सनॉन यांनी डिझायनर गाऊन घालत वेस्टर्न लूकला महत्त्व दिलं. पण, गौरी मात्र डिझायनर साडी गाऊनमध्ये ‘व्होग’च्या रेड कार्पेटवर अवतरली. तिच्या या साडी गाऊनची चर्चा सर्वत्र सुरु असून काहींनी त्याचा उल्लेख ‘लेहंगा’ म्हणूनही केला. गौरी खानच्या या डिझायनर साडी गाऊनची किंमत आहे १ लाख ५८ हजार चारशे चाळीस रुपये. झालात ना तुम्हीही थक्क? गौरीच्या या अनोख्या लूकविषयी अनेक चर्चांना उधाण आलं होतं. तिच्या या हटके लूकला नेमकं म्हणायचं तरी काय, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. सोशल मीडियावर सुरु असणारा हा एकंदर माहोल पाहता सुत्रांनुसार, गौरीने मोनिषा जयसिंगच्या नव्या कलेक्शनमधील हा डिझायनर साडी गाऊन घातला होता. राखाडी रंगाच्या या साडी गाऊनवर तिने त्याच रंगाच्या डार्क शेडमधील ब्लाऊज घातला होता. यासोबत तिने राखाडी रंगाचाच ‘बोटेगा व्हेनेटा’ या ब्रँडचा क्लचही सोबत घेतला होता. गौरीचा हा एकंदर लूक पाहता त्यासाठी तिने घसघशीत रक्कमही मोजली आहे हे स्पष्ट होतंय.